मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती

फोटो साभार भास्कर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा दहशदवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला असून हा हल्ला ड्रोन, मिसाइलच्या सहाय्याने होऊ शकेल असे संकेत मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसे पत्र गुप्तचर विभागाने मुंबई पोलिसांना दिले असल्याचे समजते. त्यामुळे सावध झालेल्या मुंबई पोलिसांनी शहरातील प्रमुख स्थळांवर सुरक्षा वाढविली आहे. मुंबईच्या उपायुक्त कार्यालयातून अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी, राष्ट्रद्रोही ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट विमाने, एरियल मिसाईल, पॅराग्लायडरच्या सहाय्याने गर्दीची ठिकाणे तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींना निशाना बनवू शकतात. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू शकतात. यामुळे उडत्या सर्व प्रकारच्या वस्तूंना प्रतिबंध केला गेला असून ड्रोन, रिमोट कंट्रोल ओब्जेक्टस आकाशात उडविण्यास बंदी केली गेली आहे. हे प्रतिबंध किमान १ महिना अथवा पुढील सूचना येईपर्यंत लागू राहणार असल्याचे समजते. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात आयपीसी कलम १८८ नुसार कारवाई केली जाणार आहे.