बिग बी सर्वात विश्वासार्ह सेलेब्रिटी

फोटो साभार नई दुनिया

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रांडस (आयआयएचबी)ने नुकत्याच सादर केलेल्या टीयारा रिपोर्ट मध्ये सेलेब्रीटींचे ब्रांड स्वरुपात सर्वेक्षण केले गेले असून त्यात सर्वाधिक गुण बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन याना मिळाले आहेत. बिगबी यांनी सिनेमा आणि समाज क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना विश्वसनीय व सन्मानित ब्रांड म्हणून नागरिकांनी पसंती दिली आहे. २३ शहरात ६० हजार नागरिकांची मते यासाठी घेतली गेली होती. या सर्वेक्षणात १८० सेलेब्रिटीचा समावेश होता. त्यात ६९ बॉलीवूड कलाकार, ६७ टीव्ही कलाकार, ३७ क्रीडापटू, व अन्य सात जणांचा समावेश केला गेला होता.

यात अमिताभ बच्चन यांना सर्वात विश्वसनीय व्यक्ती म्हणून ८८ टक्के मते मिळाली. त्या खालोखाल अक्षय कुमार याला ८६.८ टक्के तर अभिनेत्री मध्ये दीपिका पदुकोण हिला ८२.८ टक्के मते मिळाली. दीपिका सर्वाधिक विश्वसनीय महिला सेलेब्रिटी ठरली. सर्वात आकर्षक सेलेब्रिटी म्हणून अलिया भट्टची निवड झाली तर हृतिक रोशन सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरला.

टीव्ही सेलेब्रिटीमध्ये सर्वाधिक पसंती कपिल शर्मा याला मिळाली. त्याला ६२.२ टक्के मते मिळाली. क्रीडाक्षेत्रात सर्वाधिक विश्वसनीय ठरला महेंद्रसिंग धोनी. त्याला ८६.० तर महिला क्रिकेटर मिताली राज हिला ८३.२ मते मिळाली. विराट अनुष्का ७०.१ टक्के मते मिळवून सर्वाधिक विश्वासार्ह जोडपे ठरले.