देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझा थेरपी उपचार

बिहार निवडणूक प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करोना संसर्ग झाला असून त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी केली गेल्याचे समजते. बिहार मधून परतल्यावर फडणवीस यांचा करोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने त्यांना सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी त्यांना पहिला प्लाझ्मा थेरपी डोस देण्यात आला तर दुसरा डोस सोमवारी सायंकाळी देण्यात आल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. लहाने यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांना मधुमेह आहे त्यामुळे ते हायरिस्क कॅटेगरी मध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दक्षतापूर्वक उपचार केले जात आहेत. त्यांना रेमदेसिवीर इंजेक्शन सुद्धा देण्यात आले आहे. यामुळे त्याची घसरलेली ऑक्सिजन पातळी नॉर्मलवर आल्याचे सांगून डॉक्टरांनी फडणवीस यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळविले आहे.

करोना संक्रमण झाल्याचे दिसून आल्यावर फडणवीस यांनी लॉकडाऊन लागल्यापासून सतत काम करत आहे व त्यामुळे क्षणाचीही विश्रांती मिळालेली नाही असे सांगितले होते. आता थोडे थांबावे अशी देवाची इच्छा असल्याचेही ते म्हणाले होते. दरम्यान प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी नाही असे डॉक्टरच्या एका गटाचे म्हणणे आहे मात्र महाराष्ट्र सरकारने ही उपचार पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading RSS Feed