सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची व्याख्याच बदलली – चंद्रकांत पाटील


मुंबई : आपल्या स्वतःच्या सोयीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्व वापरतात. त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाची व्याख्याच बदलल्याचे दिसत असल्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर दिली.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे उद्धव ठाकरे हे विसरले आहेत. दसरा मेळाव्याच्या भाषणात सरसंघचालकांनी एक वक्तव्य केले होते, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है, ते वक्तव्य मुळात तुमच्यासाठी होते. तुमचा हा सगळा आटापिटा हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी सुरु आहे. आम्हाला तुमच्याकडून हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमच्या सोयीप्रमाणे तुमचे हिंदुत्व हे बदलते, असे पाटील हे ठाकरेंना उद्देशून म्हणाले. कोरोनाबाबत भाषणात चिडीचूप बसलात, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलला नाहीत. केवळ भाषणबाजी करून काहीही होणार नसल्याचे पाटील म्हणाले.