जांभळे अनेक औषधी गुणांनी युक्त


जांभळे खाण्याचा कालावधी म्हणजे मे च्या शेवटापासून जूनच्या शेवटापर्यंतच्या महिन्याचा कालावधी. हे फळ महिनाभरच मिळते, पण याच काळात ते आवर्जून खाल्ले पाहिजे कारण ते अनेक पोषण द्रव्यांनी युक्त असते आणि आरोग्याला उपकारक असते. त्याला इंग्रजीत ब्लॅक प्लम म्हटले जाते.

जांभळात ग्लुकोज आणि फ्रक्टोजच्या स्वरूपात साखर असते. या उन्हाळी फळात इतर फळांच्या तुलनेत कमी उष्मांक असतात. पण ते त्याचबरोबर अनेक मिनरल्सनी युक्त असते. त्यातच काही औषधी गुणधर्म असतात.

ते पिष्टमय पदार्थांचे रुपांतर ऊर्जा देणार्‍या शर्करेत करते आणि क जीवनसत्वांनी भरपूर असल्याने ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. ते पचन संस्थेच्या दोषांवर उपाय करून पचनशक्ती वाढवतोे. तेलकट त्वचेमुळे निर्माण होणार्‍या समस्या ते सोडवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment