दातांसाठी आता लेसर उपचार पद्धत


दात किडल्यानंतर केले जाणारे उपचार म्हणजे काय असते हे संबंधित रुग्णांना चांगलेच माहीत आहे. दातातील किडलेला भाग कापून त्या जागी चांदी भरले किंवा रुट कॅनल ट्रिटमेंट करणे हे काम वेळ खाणारे आणि यातनामय असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शास्त्रज्ञ त्याला पर्याय शोधत होते आणि ते आता सापडला आहे.

दातांचे किडणे किंवा दंतक्षय हे प्रकार डेंटीन या द्रव्याच्या कमतरतेमुळे सुरू होतात. आता त्यावर लेसर उपचार शोधून काढण्यात आला आहे. कमी तीव्रतेचा लेसर किरण दातांच्या पेशींवर टाकला की तिथे डेंटीनची वाढ होण्यास सुरुवात होते. डेंटीन वाढले की किडलेला भागही आपोआप गळून पडतो.

अमेरिकेतल्या हार्वर्ड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड अरलाईड सायन्सेस या संस्थेतील संशोधक प्रा. डेव्हिड मूनी यांनी या संशोधनाची माहिती दिली. या लेसर किरणांचे प्रयोग आधी उंदरांवर करण्यात आले आणि नंतर मानवी पेशींवर शरीराबाहेरही करण्यात आले. ते यशस्वी झाले असल्याने या लेसर किरणांचा वापर लवकरच प्रत्यक्षात व्यवसायात सुरू होईल अशी आशा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment