राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे कोरोनाबाधित


मुंबई – कोरोनाची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली. तसेच आपण खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.


ट्विटरच्या माध्यमातून संदर्भातील माहिती तटकरे म्हणाले की, सोमवारी माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असे म्हटले आहे.