चांगल्या झोपेने स्मरणशक्ती वाढते


वय वाढत चालले की, स्मरणशक्ती क्षीण व्हायला लागते हे तर उघडच आहे. पण स्मरणशक्तीवर झोपेचाही परिणाम होतो. झोप जितकी शांत लागेल तेवढी स्मरणशक्ती टिकून राहते असे अनेक प्रयोगांतून दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी ही गोष्ट तर दाखवून दिली आहेच पण झोपेचा स्मरणशक्तीवर कसा परिणाम होतो याची प्रक्रियाही शोधून काढली आहे.

अभ्यास केल्यानंतर झोप घेतली की ही झोप आपल्या मेंदूतल्या डेंड्रीटिक स्पाइन्स वाढीला गती देते. डेंड्रीटिक स्पाइन्स हे मेंदूच्या पेशींचे घटक असतात. हे घटक मेंदूच्या इतर पेशींशी संपर्क साधतात आणि त्यांच्याकडे माहिती पाठवतात. त्यामुळे केलेला अभ्यास मेंदूत जमा होतो, स्मरणशक्ती वाढते.

डेंड्रीटिक स्पाईन्सची ही वाढ गाढ झोपेतच होते म्हणून अभ्यासानंतर लगेच झोपी गेले पाहिजे. हे प्रयोग तूर्तास उंदरांवर यशस्वी झाले आहेत. न्यूयॉर्कच्या एनवाययू लांगून मेडिकल कॉलेजमध्ये हे प्रयोग जारी आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment