कडू कारले आरोग्यासाठी गोड


एखाद्या आनंदाच्या प्रसंगी मेजवानी दिली जात असताना मेनूमध्ये कारल्याच्या भाजीचा समावेश केलेला कधी पाहिला आहे का? कारल्याची भाजी असते, ती खाल्ली जाते पण ते कडू असल्यामुळे सर्वांना नकोसे वाटते. विशेष म्हणजे कारले कायम कडूच असते. म्हणून मराठीत एक म्हण आहे ‘कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच कडू.’

हे सर्वांना नकोसे वाटणारे कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड असते. म्हणजे कारल्याची भाजी खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम गोड असतात. त्याच्यात असलेल्या फायटो रसायनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यात बेटा कॅरीटीन असल्यामुळे ते डोळ्यासाठी चांगले असते. दमा, बॉन्कॉइटीस आणि फॅरीजीटस् हे श्वसनाचे विकार दुरुस्त होण्यासाठी रोज कार्ल्याचा रस प्यावा. रस पिताना त्यात थोडा मध टाकावा म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल.

झोपेतली नियमितता, कार्यक्षमतेचा अभाव यावर कारले हा उत्तम उपाय आहे. मधुमेहाची तीव्रता कमी करणे आणि पचनशक्ती वाढवणे यासाठीही कारल्याचा रस उपयुक्त ठरतो. पोट साफ होण्यास कारले गुणकारी ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment