करोना काळातील सर्वात मोठी निवडणूक बिहारची

फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेज मध्ये उद्या मतदान होत आहे. या फेज मध्ये ७१ जागांसाठी २.१४ कोटी मतदार आहेत. करोना काळात ही निवडणूक होत आहे आणि विशेष म्हणजे करोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक मानली जात आहे.

महिन्यापूर्वी न्यूझीलंड मध्ये करोना काळात निवडणूक झाली आहे पण तेथे मतदार संख्या ३४.८७ लाख इतकी होती. म्हणजे बिहार मध्ये न्यूझीलंडच्या सहा पट जास्त मतदार आहेत. एप्रिल मध्ये द.कोरिया येथेही मतदान झाले तेथे ४.३९ कोटी लोकांनी मतदान केले. बिहार निवडणुकीत ७.२९ कोटी मतदार आहेत.

बिहार निवडणुकीत पहिल्या फेजमध्ये ७१ जागांसाठी  राजद ४२, जदयु ४१, भाजप २९, कॉंग्रेस २१, एलजेपी ४१ जागा लढवत आहे. निवडणूक आयोगाने मतदान शांततेत व्हावे तसेच मतदारांना करोना पासून संरक्षण मिळावे म्हणून नियमावली जारी केली आहे. यंदा जदयु, भाजपने करोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन बिहारी जनतेला दिले आहे. विशेष म्हणजे भाजपचे बिहार मधील मंत्री सुशील मोदी, निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस, राजीव प्रताप रुडी व शाहनवाज हुसेन यांना करोना संसर्गाने ग्रासले आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, याच्या सभांनी वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे.