मेहबूबांच्या विधानाविरोधात तीन नेत्यांचा पक्षत्याग


श्रीनगर- जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या निर्णयावरून पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची विधाने देशभक्तीच्या भावनांना दुखावणारी असल्याची टीका करून पक्षाच्या ३ नेत्यांनी पक्षत्याग केला आहे. टी एस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन वफा या तिघांनी आपला राजीनामा मुफ्ती यांच्याकडे पाठविला आहे.

काश्मीरची स्वायत्तता पार्ट करून जम्मू काश्मीरचा झेंडा फडकल्याशिवाय तिरंगाही फडकू देणार नाही, असे विधान मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते. स्वायत्तता परत मिळाल्याशिवाय कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुफ्ती यांची वक्तव्य आणि कृत्य यांनी आपल्याला बेचैन वाटत असल्याचे या तिघांनी आपल्या राजीनाम्याच्या नमूद केले आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने मुफ्ती यांच्या निषेधार्थ श्रीनगर आणि जम्मू येथे ‘झेंडा मार्च’ काढला. बुलेटप्रूफ गाड्यांवर तिरंगी झेंडे फडकावून हा मार्च काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.