टाटा मोटर्सने पार केला ४० लाख वाहन उत्पादनांचा टप्पा


पुणे: टाटा मोटर्सने ४० लाख प्रवासी वाहनांच्या उत्पादनाचा टप्पा पार करून या क्षेत्रात मानदंड प्रस्थापित केला आहे. टाटा उद्योग समूहाने सन १९८८ पासून वाहन उत्पादन क्षेत्रात पदार्पण केले आहे. इंडीका, सिएरा, सुमो, सफारी, नॅनो अशा गाड्या कंपनीने बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत.

सन २०२० पर्यंत कंपनीने टिआगो, टिगोर, नॅक्सॉन, हॅरियर आणि अल्ट्रोज़ अशा हॅचबॅक, सब हॅचबॅक कॉम्पॅकट, सेडान, एसयूवी वाहनांना बाजारपेठेत आणले आहे. मागील ५ वर्षात कंपनीने १० लाख वाहनांचे उत्पादन करून त्यांना बाजारपेठेत आणले होते. इतर सामान्य वाहनांप्रमाणेच कंपनीने टिगोर इव्ही आणि नॅक्सॉन इव्ही या विजेवर चालणाऱ्या गाड्याही उपलब्ध करून दिल्या आहेत. इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारपेठेत कंपनीचा ६७ टक्के वाटा असल्याचा दावा ‘टाटा मोटर्सच्या वतीने करण्यात आला.

कंपनीने 2005-2006 मध्ये 10 लाख वाहनांची विक्री केली होती. सन 2015 पर्यंत ही संख्या 30 लाख वाहनांवर पोहोचली. आता टाटा मोटर्स ने 40 लाख वाहन विक्रीचा एकदा पार केला आहे. अर्थात मागील 5 वर्षात टाटा मोटर्सने भारतीय बाज़ारपेठेत 10 लाख वाहनांचे उत्पादन केले आहे. सध्या पुणे येथील चिखली, गुजरातमधील सानंद आणि पुण्याजवळ राजनांदगांव येथे कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत.