उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचे उत्तर


मुंबई – नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. नारायण राणेंची उद्धव ठाकरे यांनी बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का?, असा खोचक सवाल ठाकरे यांना केला आहे.


काल दसरा मेळाव्यातून राज्य सरकारवर व शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. यात त्यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी ट्विट आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये “दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha Salainची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” असे म्हटले आहे.