१०० कोटी खर्चून हृतिकने खरेदी केली दोन अलिशान घरे

फोटो साभार मुंबई मिरर

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याने मुंबई मध्ये जुहू वर्सोवा या महागड्या परिसरात नुकतीच दोन घरे खरेदी केली असून त्यासाठी जवळजवळ १०० कोटी रुपये मोजले आहेत. ही दोन्ही घरे सी फेसिंग असून येथून अरबी सागरचे मनोरम दृश्य दिसते. या घरांच्या अनेक खासियती सांगितल्या जात आहेत.

मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार या दोन घरांसाठी हृतिकने ९७.५० कोटी रुपये मोजले असून १.९५ कोटींचे मुद्रांक शुल्क भरले आहे. एका अपार्टमेंट मध्ये ही घरे असून इमारतीचे नाव मन्नत आहे. त्यातील एक पेंट हाउस आहे तर दुसरे घर याच घराला जोडले जाणार आहे. दोन्ही घराचा एरिया ३८ हजार चौरस फुटांचा असून येथे हृतिकला १० कार पार्किंग आहेत.

दोन्हीपैकी एका घराला ओपन स्काय टेरेस आहे आणि खासगी लिफ्ट आहे. पेंट हाउसची किंमत ६७.५० कोटी आहे तर दुसऱ्या घराची किंमत ३० कोटी सांगितली जात आहे. हृतिक सध्या भाड्याच्या घरात राहत असून त्या घराला महिना साडेआठ लाख रुपये भाडे भरावे लागत आहे.