ट्रम्प यांनी फ्लोरिडा मध्ये केले मतदान

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत आपले मत शनिवारी नोंदविले. ट्रम्प फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना ट्रम्प यांनी हसत हसत त्यांनी ट्रम्प नावाच्या व्यक्तीला मत दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या वेळी ट्रम्प मास्क घालून मतदानासाठी आले होते.

मतदान प्रक्रियेबद्दल बोलताना ते म्हणाले, मतदानाची प्रक्रिया अगदी सुरक्षित असून यात अफरातफरीला संधी नाही. सर्व काही अगदी परफेक्ट आहे आणि नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ते पत्रकारांसोबत जास्त काळ असतील असे सांगितले. ट्रम्प शेवटच्या प्रचार सभेसाठी बायडेन यांच्या विरुद्ध मोठ्या सभा घेणार आहेत. नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन आणि ओहियो येथे या सभा होणार आहेत. अमेरिकेत आत्तापर्यंत ५ कोटी नागरिकांनी मतदान केले असून करोना मुळे अनेक नियम लागू झाले आहेत आणि त्याचे पालन करूनच मतदान घेतले जात आहे.