एलियन्स हल्ल्याच्या अफवेने ब्रिटन मध्ये दहशत

ब्रिटन मधील कॉवेन्ट्री शहरात एलियन्सचा हल्ला झाल्याच्या बातमीने दहशतीचे वातावरण पसरल्याची घटना घडली. या काळात विमानांचे मार्ग बदलले गेल्याने या बातमीला अधिक पुष्टी मिळाली. कॉवेन्ट्री शहरावर रात्रीच्या काळोखात अतिशय तेजस्वी हिरवा निळा प्रकाश दिसत होता आणि या प्रकाशाची किरणे जमिनीवर पडत होती. या प्रकाश अतिशय वेगाने प्रवास करत होता त्यामुळे आकाशात उडत्या तबडक्या आल्याची आणि त्यातून जमिनीवर लाईट पडत असल्याची चर्चा सुरु झाली. कुणीतरी सोशल मीडियावर एलियन हल्ला झाल्याचे फोटो पोस्ट केले आणि पाहता पाहता ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले.

मात्र त्यानंतर हा प्रकाश म्हणजे क्वांट लेजर कंपनी लेझर टेस्टिंग करत होती त्यामुळे दिसत असल्याचे खुलासा कंपनीने केला. हा प्रकाश २० मैलावरून सुद्धा दिसत होता. अर्थात कंपनीने प्रशासनाला त्याबाबत अगोदरच कल्पना देऊन योग्य परवानगी घेतली होती. तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या टेस्टिंगची कल्पना दिली गेली होती. लेझर बीमपासून विमानांना त्रास होऊ नये म्हणून विमानांचे मार्ग बदलले गेल्याचा खुलासा केला गेला आहे. या कंपनीने अन्य शहरातून सुद्धा लेझर बीम चाचण्या केल्या आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.