एलजी विंग स्मार्टफोनची भारतात २८ ऑक्टोबरला एन्ट्री

फोटो साभार भास्कर

दक्षिण कोरियन कंपनी एलजीने त्यांचा एलजी रोटेटिंग स्क्रीन असलेला विंग स्मार्टफोन जागतिक बाजारात गेल्या महिन्यात सादर केला असून हा फोन भारतात २८ ऑक्टोबर रोजी लाँच केला जात आहे. कंपनीने सोशल मिडियावर या फोनचे टीझर सादर केले आहेत. हा फोन एलजीच्या एक्सप्लोरर प्रोजेक्ट खाली तयार केला गेला आहे. फोनचे डिझाईन पूर्णपणे नवे आहे.

एलजी विंग ला दोन स्क्रीन असून त्यातील एक स्क्रीन ९० डिग्री फिरविता येतो. स्क्रीन फिरत असला तरी हा फोन रेग्युलर फोन प्रमाणेही वापरता येतो. दोन स्क्रीन असल्याने डिव्हाइस थोडे जड झाले असून फोनचे वजन २६० ग्राम आहे. मेन स्क्रीन ६.८ इंची असून दुसरा ३.९ इंची आहे.

हे दोन्ही स्क्रीन ड्युअल स्प्रिंग व ड्युअल लॉक मेकॅनीझम सह असून हिंजेस दिल्या गेल्या आहेत. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी तसेच २५६ जीबी स्टोरेज मध्ये फोन उपलब्ध आहे. त्याला पॉप अप कॅमेरा दिला गेला आहे. ३२ एमपीचा हा सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. रिअरला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्यात ६४ एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि १२ व १३ एमपीचे अल्ट्रा वाईड सेन्सर आहेत.