मूड ऑफ होण्यावर उपाय काय?


कधी कधी आपला मूड छान लागलेला असतो, पण असे काही तरी ऐकण्यात येते, समोर घडते किंवा आठवते की त्यामुळे आपला मूड क्षणात बदलून जातो. आपण एकदम उदास होऊन जातो. मात्र ही मन:स्थिती दिवसभर टिकून राहणे योग्य नाही. या मन:स्थितीच्या बदलावर मात करून आपल्याला पूर्ववत आपली मन:स्थिती ताळ्यावर आणता आली पाहिजे आणि दिवस वाया गेला नाही पाहिजे.

त्यावर काही उपाय आहेत. १) हसणे – हसणे हा आपल्या भावनिक समस्येवरचा उत्तम उपाय आहे. मनसोक्तपणे आणि मन:पूर्वक हसलो तर केवळ मन:स्थितीच बदलते असे नाही तर आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात. २) व्यायाम – व्यायामाने आपला दिवस छान सुरू होतो. त्यामुळे एन्डॉर्फिन ग्रंथी कार्यरत होतात आणि मन:स्थिती चांगली होऊन जाते.

३) सूर्यप्रकाश – मूड गेला की, स्वच्छ सूर्यप्रकाशाकडे बघा. सूर्यप्रकाशातील ड जीवनसत्वामुळे चित्तवृत्ती उल्हसित होतात. ४) संगीत – संगिताने तर माणसाच्या मन:स्थितीवर चांगलाच परिणाम होत असतो. एखादे शांत संगीत मिनिटभर ऐकले की, गेलेला मूड परत येतो. ५) फोटो – आपला एखादा लहानपणीचा फोटो किंवा तरुण वयातला फोटो पुन्हा एकदा बघायला लागतो तेव्हा आपण नकळतपणे त्या सुखद काळात जातो. फोटो काढतानाचा अनुभव आपल्या मनात जागा होतो आणि आपली वृत्ती बदलून जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment