कोरोना विषाणू आणि पेंग्विन महासरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांना ग्रासतील; अमृता फडणवीस


मुंबई – पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नसल्याचे ट्विट करुन अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

समित ठक्कर या तरुणाला शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आनंद रंगनाथन यांनी या अटकेनंतर ठाकरे सरकारबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली. समित ठक्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पावरलेस मुख्यमंत्री असे ट्विट केल्यामुळे समितला अटक केली का? असा प्रश्न आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत विचारला. अमृता फडणवीस यांनी आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना पुन्हा एकदा ‘पेंग्विन महा सरकार विषाणू’ म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही, कुठे, कसे ग्रासतील हे सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून आपला बचाव करा.. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!