झोप हि अति महत्वाची


पुरेशी झोप न होणे आणि झोपेच्या वेळा निश्‍चित नसणे ही गोष्ट आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम करत असते. पूर्वी असे म्हटले जात असे की, ज्यांना निरनिराळ्या पाळ्यांमध्ये काम करावे लागत असे त्यांनाच हे परिणाम भोगावे लागतात. पण आता असे लक्षात आलेले आहे की, पाळ्यात काम करणार्‍या लोकांशिवाय अन्यही लोकांमध्ये झोपेमुळे निर्माण होणारे विकार आढळत आहेत. जगातल्या दर पाचपैकी चार माणसे झोपेच्या अनियमिततेचे बळी ठरत आहेत.

झोपेच्या अनियमिततेचे अनेक प्रकार आहेत. त्यातला सर्वात मोठा प्रकार म्हणजे कमी झोप घेणे. आपण जितकी झोप कमी घेऊ तेवढा दिवसातला जास्त वेळ कामासाठी वापरता येईल म्हणून लोक कमीत कमी झोपविण्यावर भागविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कमी झोप घेण्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही, कार्यक्षमता निर्माण होत नाही आणि अशा या अवस्थेत आपण काम करत राहतो.

पूर्वी आठ तास झोप आणि सोळा तास काम असे कोष्टक होते. म्हणजे दोन तास कामांसाठी एक तास झोप घेतली जात होती. वेगळ्या शब्दात सांगायचे तर कामाचे आणि झोपेचे तास यांचे गुणोत्तर एकास दोन असे होते. आता लोक सहा तास झोप घेत आहेत आणि १८ तास काम करत आहेत. त्यांच्या मते ते केवळ दोन तास कमी झोेप घेत असतात. परंतु हा हिशोब वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे.

आता सहा तास झोप आणि १८ तास काम केल्याने तीन तास कामाला एक तास झोप असे प्रमाण पडत आहे. म्हणजेच काम आणि विश्रांती यांचे गुणोत्तर दीड पटीने वाढले आहे. आपण आपल्या शरीराला दीड पट जास्त राबवत आहोत. खरे म्हणजे हा हिशोब आणखी तपशीलात गेल्यास वेगळा होतो. आपण केवळ १८ तास काम करत आहोत असे नाही तर कमी विश्रांती घेतलेल्या शरीराला म्हणजेच अकार्यक्षम शरीराला दीड पट काम लावत आहोत. परिणामी आपली कामे यशस्वी होत नाहीत. सांगायचे तात्पर्य एवढे की, आठ तासापेक्षा कमी झोप घेणे हे आपल्यासाठी फारच घातक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment