पुन्हा एकदा ठाकरे सरकार व संजय राऊत यांच्यावर कंगनाने साधला निशाणा


मुंबईः नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगनाने पुन्हा एकदा ठाकरे सरकारसह संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने आपल्या ऑफिसचा फोटो पुन्हा शेअर करत पुन्हा ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांना डिवचले आहे. माझे तुटलेले स्वप्न संजय राऊत तुमच्याकडे पाहून हसत आहे. माझे घर पप्पू सेना तोडू शकते मला नाही. आज वाईटावर बंगला क्रमाक ५ ने विजय मिळवला असल्याचे खोचक ट्विट करत कंगनाने निशाणा साधला आहे.