वजन आणि हृद्रोगाचा धोका कमी करणारा आहार


कॅनडातल्या काही संशोधकांनी कार्बोहैड्रेटस्चे प्रमाण कमी असणारा असा आहार शोधून काढला आहे की, ज्या आहाराने वजन तर कमी होतेच पण हृदय विकाराचा धोकाही कमी होतो. १० वर्षात या आहाराने हा परिणाम जाणवतो. त्याने हृदय विकाराचा धोका १० टक्क्यांनी कमी होतो.

सेंट मायकेल्स् हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात हे दिसून आले आहे. या संशोधनातून विकसित करण्यात आलेला विशेष आहार ऍटकिन्स डाएट म्हणून प्रसिद्ध आहे. आहारात कर्बोदकांचे प्रमाण कमी असणारे काही खाद्य पदार्थ अशी वेगळी यांचे मिश्रण करण्यात आले आहे.

या आहारात स्निग्धांशाचे प्रमाण कमी आहे. या आहाराने सहा महिन्यातच वजन कमी होते. ते चार पौंडापर्यंत घटते. कारण या आहारातून सामान्य कर्बोदकांपेक्षा २६ टक्के कमी उष्मांक मिळतात. उष्मांक कमी असल्याने वजन घटते तर स्निग्धांश कमी असल्याने हृदय विकाराचा धोका टळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment