अजित डोवाल कुलदेवी पूजेसाठी गावी रवाना

फोटो साभार अमर उजाला

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पत्नी, मुलासह नवरात्रीतील कुलदेवी पूजेसाठी उत्तराखंड दौऱ्यावर गेले असून त्यांचा हा दौरा खासगी स्वरूपाचा आहे. शुक्रवारी सकाळी डोवाल हृषीकेशच्या परमार्थ निकेतन मध्ये यज्ञात सहभागी झाले. येथे त्यांनी विश्वशांती यज्ञात आहुती दिल्या. पत्नी समवेत त्यांनी येथे पूजा केली आणि त्यांनंतर ते ज्वाल्पा मंदिरात मातेच्या दर्शनासाठी गेले. तेथे त्यांनी देवी आणि शिवाची उपासना केली तसेच मंदिरातील पुजारी आणि मंदिर समितीबरोबर चर्चा केली.

शुक्रवारी रात्री परमार्थ निकेतन मध्ये मुक्काम करून शनिवारी सकाळी ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे पौडी येथील घिडी या पैतृक गावी पोहोचले. तेथे ते दरवर्षी प्रमाणे घराण्याच्या बालकुमारी देवीची पूजा करणार आहेत. आज रात्री ते पुन्हा हृषीकेशला परतणार आहेत आणि रात्री गंगा आरती मध्ये सहभागी होणार आहेत. दोवाल दरवर्षी नवरात्रात गावी येऊन कुलदेवतेच्या पूजेत सहभागी होतात असे समजते.