असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा


नवी दिल्ली : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून त्यानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक देखील जारी करण्यात आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होईल. दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे, त्यानंतर टी-20 मालिका आणि शेवट कसोटी मालिकेने होणार आहे.

यासंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार पहिले दोन एकदिवसीय सामने 27 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळवले जातील तर तिसरा एकदिवसीय सामना मनुका ओव्हल म्हणजेच कॅनबेरा येथे खेळवला जाणार आहे. तर टी -20 मालिकेचा पहिला सामना मनुका ओव्हल खेळवला जाईल. तर उर्वरित दोन टी-20 सामने सिडनीमध्ये खेळवले जातील.

त्याचबरोबर पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाणार आहे. 17 ते 21 डिसेंबर दरम्यान एडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी एडिलेडला बॅकअप ठिकाणही बनवण्यात आले आहे, कारण कोरोनाच्या निर्बंधामुळे मेलबर्न येथे सामना आयोजित केला जाऊ शकणार नाही असा अंदाज वर्तविला जात आहे. कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनी येथे 7 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान, तर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 15 ते 19 जानेवारी 2021 दरम्यान ब्रिस्बेन येथे खेळला जाईल.

असे टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक
एकदिवसीय मालिका

पहिला वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे – 1 डिसेंबर – मनुका ओव्हल कॅनबेरा

टी-20 मालिका
पहिला टी-20 – 4 डिसेंबर – मनुका ओव्हल कॅनबेरा
दुसरा टी-20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी मालिका
पहिली कसोटी – 17-21 डिसेंबर – एडिलेड
दुसरी कसोटी – 26-31 डिसेंबर – मेलबर्न
तिसरी कसोटी – 7-11 जानेवारी – सिडनी
चौथी कसोटी – 15-19 जानेवारी – ब्रिस्बेन