ध्यानाची पुढची पायरी प्रार्थना

डॉक्टर शरीरावर इलाज करतात पण शरीराला होणार्‍या आजारांचे मूळ मनात असते. डॉक्टर आपल्या रुग्णावर उपचार करताना त्याच्या मनाचा विचार करीत नाहीत. म्हणजे आजाराच्या मुळाशी जात नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेले उपचार नेहमीच वरवरचे ठरतात. मग रुग्ण वारंवार त्याच आजाराने त्रस्त राहातो. गंमतीचा भाग असा की स्वत: डॉक्टरही असेच त्रस्त असतात म्हणून मुंबईत सध्या डॉक्टरांचे मानसिक आरोग्य असा एक चर्चेचा विषय झाला आहे. या डॉक्टरांना त्या  त्रासापासून मुक्त व्हायचे असेल तर त्यांना प्रार्थनेचा आधार घ्यावा लागेल. प्रार्थना ही ध्यानापेक्षाही श्रेष्ठ असते असे काही मानस शास्त्रज्ञांना आढळले आहे. ध्यानाने स्वत:च्या आतल्या ताकदीचे प्रत्यंतर येते पण प्रार्थनेने आपल्यापेक्षा ताकदवान शक्तीची आराधना केली जात असते. स्वित्झर्लंडमधील तज्ञ डॉक्टर मानसशास्त्रज्ञ मॅडम डे स्टील यांनी प्रार्थनेची ही आगळी वेगळी व्याख्या करून प्रार्थनेचे महत्त्व विशद केले आहे. 

माणूस प्रार्थना करतो तेव्हा तो केवळ त्या शक्तीची आराधनाच करतो असे नाही तर तिच्या सामर्थ्याला आवाहन करतो. तिची मदत मागतो. प्रार्थना हिचा अर्थ आहे. एखाद्या मंत्राचा तालासुरात आणि एका ठेक्यात वारंवार उच्चार करणे. या उच्चारालाच मंत्र जप असे म्हटले जाते. या मंत्रात देवाचे आभार मानले जात असतात. आपण केेलेल्या दुष्कृत्यांची कबुली देऊन देवाची माङ्गी मागितलेली असते आणि आपल्या कामाचे चांगले ङ्गल मिळावे अशी मागणी केलेली असते. माणसाच्या आयुष्यात काही काही वेळा पैशापेक्षाही आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते. तेव्हा मंत्रांमधून आणि प्रार्थनेतून  देवाकडे आयुरारोग्य मागितले जात असते. प्रार्थनेच्या धार्मिक अंगाला लोक ङ्गाजील महत्त्व देत असतात. 

खरे तर प्रार्थनेचे मानसिक लाभ अधिक होत असतात. प्रार्थना हा एक मानसोपचार असतो. त्याने माणसाला शांती, आरोग्य आणि समाधान मिळत असते. प्रार्थनेने मनातले तणाव कमी होऊन मन शांत होते.अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये प्रार्थनेच्या मानसिक आरोग्यावरील परिणामांवर अनेक प्रयोग करण्यात आले. मनाला जाणवणारा तणाव कमी करून डिप्रेशन कमी करण्याची ताकद प्रार्थनेत असते असे या प्रयोगांत दिसून आले आहे. प्रार्थना सामूहिकही करता येते आणि वैयक्तिकही असते. पण सामूहिक प्रार्थनेपेक्षा वैयक्तिक प्रार्थनेचा प्रभाव अधिक पडतअ असतो असे या प्रयोगांत आढळून आले आहे. प्रार्थनेने ती करणारांची स्वत:बद्दलची धारणाच बदलून जाते. आपण या विश्‍वाचे एक घटक आहोत ही भावना वाढीस लागते. दररोजच्या जीवनात येणार्‍या तणावांचा सामना करण्याचे कौेशल्य आणि ताकद वाढते. हार्वर्ड विद्यापीठातल्या ह्दयरोग   विभागाचे प्रमुख डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनीही प्रार्थनेने हृदयावर होणारे परिणाम नोंदवून ठेवले आहेत. माणसाच्या हृदयाची स्थिती प्रार्थनेने सुधारते असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment