थायलंडच्या राजाचे कुत्रे फुफू हवाईदल प्रमुख

थायलंडचे राजे महावाचीरालोंगकोन आणि थायलंड सरकार विरोधात नागरिक रस्त्यावर येऊन निदर्शने करत आहेत आणि देशात लागू असलेल्या जमावबंदीची पर्वा न करता एकत्र येऊन देशात लोकशाही यावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान थायलंडच्या राजाने जर्मनी मध्ये आश्रय घेतला आहे. राजाने त्याचा आवडता कुत्रा फुफू याची एअर मार्शल म्हणून नियुक्ती केली असून या फुफु साठी स्वतंत्र आसन दिले आहे. त्याच्या तैनातीसाठी लाखो डॉलर्सचा खर्च केला जात आहे.

थायलंड मधील जनतेच्या मनात राजा आणि सरकार बद्दल कमालीचा संताप आहे त्यामुळे गेले अनेक दिवस जनता रस्त्यावर उतरून निदर्शने करते आहे. पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाहीच पण देशात आणीबाणी लागू केली आहे. राजे महावाचीरालोंगकोन यांनी जर्मनी मध्ये पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्काम टाकला आहे. त्याच्यासोबत त्यांच्या चार पत्नी आणि २० सेक्स सोल्जर्स आहेत. या ६८ वर्षीय राजाला सौंदर्यवतींचा शौक असून त्याच्या या २० सेक्स सोल्जर्स त्याच्या बॉडी गार्ड आहेत. त्यातील एकीशी राजाने नुकताच विवाह केला असून ती त्याची चौथी राणी बनली आहे.