कॉन्टॅक्ट लेन्सपासून सावध

चष्मीश झालेले कोणाला आवडेल ? विशेषत: कमी वयात चष्मा लागला असेल तर तो नकोच असतो कारण चष्मा असेल तर लग्नात अडथळे येतात.मुलाकडची मंडळी, चष्मेवाली मुलगी नको असे स्पष्ट सांगतात. चांगली स्थळे हातची जातात. पण चष्मा लागलाच तर काय करणार ? त्यावर इलाज म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स. हजारो मुली चष्म्याच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स लावत असतात. पण आता काही निरीक्षणांती शास्त्रज्ञ अशा निष्कर्षाप्रत आले आहेत की कॉन्टॅक्ट लेन्स लावणे हे धोक्याचे आहे. नळाच्या पाण्यात असणारा एक जंतू कॉन्टॅक्ट लेन्सच्या माध्यमातून डोळ्यात आणि बुबळात प्रवेश करतो आणि डोळ्याला अपाय करतो. त्यातून कदाचित अंधपणाही येऊ शकतो. या जंतूचे नाव ऍकान्थमोईबा असे आहे. तो नळाच्या पाण्यात जसा सापडतो तसाच तो धुळीत, समुद्राच्या पाण्यात, पावसाच्या पाण्यात आणि जवतरण तलावा तल्या पाण्यातही सापडतो. हा जंतू अनेकांना अंधत्व बहाल करण्याची शक्यता आहेच पण, ती शक्यता कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारांच्या बाबतीत अधिक आहे. या जंतूचा संसर्ग होण्याचे एकूण प्रकार कमीच आहेत पण त्यावर उपचार ङ्गार काळपर्यंत करावे लागतात आणि त्यातूनही गुण येण्याची शक्यता कमीच असते. म्हणून त्याच्या पासून सावध राहिले पाहिजे. या प्रकाराची माहिती डेली मेल या दैनिकाने प्रसिद्ध केली आहे.

या जंतूचा उपसर्ग होण्याची शक्यता कॉन्टॅक्ट लेन्स वापर णारांच्या बाबतीत जास्त आहे कारण या लेन्सचे आपल्या डोळ्यातले स्थान वेगळेच असते. स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑङ्ग स्कॉटलंड मधील संशोधक डॉ. ङ्गियोना हेन्रीक्वेझ यांनी हे कारण आपल्या निरीक्षणातून शोधून काढले आहे. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाच्या व्यक्तीच्या नजरचुकीने लेन्स घालताना ते या जंतूसह घातले गेले तर ते बुबळात प्रवेश करतात आणि लेन्सच्या आधाराने तिथेच राहतात. एकदा तिथे प्रवेश मिळाला की त्यांना बाहेर जाता येत नाही. तिथेच ते आपले काम सुरू करतात. बुबळाला टोकरायला लागतात आणि आता प्रवेश करतात. तिथेच त्यांची वीण वाढते आणि त्यांचे काम व्यापक होऊन जाते. डोळ्याची क्षमता कमी होते.

या जंतूचा प्रादुर्भाव झाला असेल तर डोळ्यांना सतत पाणी येते. डोळ्यांचा दाह होतो. समोरचे दृष्य पुसट दिसायला लागते. डोळ्याला प्रकाश सहन होत नाही. वरची पापणी सुजते आणि तिला वेदना होतात. काही तज्ज्ञांच्या मते तर या जंतूच्या संसर्गामुळे साधारण आठवडाभराच्या काळात दृष्टी जाऊ शकते. अर्थात या त्रासावर इलाज आहेच. काही ड्रॉप्स् त्यासाठी सुचवले जातात. तर वीस मिनिटाला ते डोळ्यात टाकले तर तीन आठवड्यामध्ये हा त्रास कमी होऊ शकतो. मात्र या काळात रुग्णाला रुग्णालयात ऍडमिट व्हावे लागते. त्रास अधिक प्रमाणात असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment