व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीने घरबसल्या अंतराळसफर

अहमदाबाद – अंतराळ सफर करावी अशी इच्छा अनेकांना असते मात्र त्यासाठी येणार्‍या खर्चाअभावी ही इच्छा पूर्ण करणे असंभवच असते. आता अंतराळात जाऊन पृथ्वीचे २० हजार फूट उंचीवर जाऊन दर्शन घेणे शक्य होणार आहे तेही फक्त ४००० रूपयांत आणि तेही घरबसल्या. भारतीय वंशाचे संशोधक सावन छनियारा यांनी इंग्लंडमधील सरे स्पेस सेंटरमधील टीमबरोबर काम करून हे तंत्रज्ञान विकसित करण्यास हातभार लावला आहे. छनियारा यांच्याबरोबर डॉ.एरिक नोल, डॉ.थॉमर फ्रेम यांनी हे संशोधन केले आहे.

आजपर्यंत जगभरातील केवळ ४३० लोकच अंतराळप्रवासाचा अनुभव घेऊ शकले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे आता कुणीही हा आनंद घेऊ शकेल. त्यासाठी व्हर्चुअल राईड स्पेस टेक्नॉलॉजी नावाने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानात ऑक्युरल रिफ्ट नावाचे उपकरण घालावे लागणार आहे आणि त्याची किंमत आहे ४ हजार रूपये. या संशोधकांनी २४ हाय क्वालिटी कॅमेरे बसविलेले गरम हवेचे फुगे २० किमी उंचीवर सोडले आणि त्यातून पृथ्वीचे रेकॉडिंग केले गेले आहे. त्यांना या प्रकल्पासाठी एप्रिल २०१५ ची मुदत दिली गेली होती आणि हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे असे समजते.

Leave a Comment