लिपस्टीकचा परिणाम हृदयावर

सौंदर्य प्रसाधनांचे अनेक दुष्परिणाम आता पुढे यायला लागले आहे. या सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाणारी काही रसायने चक्क कर्करोगाला निमंत्रण देणारी असतात हे कळल्यापासून तर शास्त्रज्ञांनी लोकांना सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत अतिशय सावध राहण्याचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतल्या कॅलिङ्गोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संबंधात लिपस्टीकवर काही संशोधन केले तेव्हा असे आढळले की, लिपस्टीकमध्ये वापरल्या जाणार्‍या काही द्रव्यांमुळे हृदयविकार जडू शकतो किंवा स्नानू शैथिल्याचा विकार होऊ शकतो. लिपस्टीक मध्ये वापरले जाणारे हे द्रव्य हॅन्डवॉश आणि त्याच कामासाठी वापरल्या जाणार्‍या काही साबणांमध्येही वापरले जात असते. हे द्रव्य म्हणजे ट्रायक्लोसान. ट्रायक्लोसानमुळे हृदयाच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे सिद्ध करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी केवळ ट्रायक्लोसानचा हृदयावर काय परिणाम होऊ शकतो याची चाचणी घेतली तेव्हा असे आढळले की, हृदय या द्रव्याच्या संपर्कात केवळ २० मिनिटे आले तरी हृदयाच्या कार्यकलापावर २५ टक्के परिणाम होतो. म्हणजे लिपस्टीक आणि हॅन्डवॉशमध्ये वापरले जाणारे हे द्रव्य किती धोकादायक आहे हे यावरून लक्षात येते. त्या परिणामांचा हा सज्जड पुरावाच आहे. असे असले तरी या संशोधनाच्या आणि निष्कर्षाच्या बाबतीत सौंदर्य प्रसाधनांची इंडस्ट्री सावध झालेली आहे. 

अमेरिकेत सौंदर्य प्रसाधनांमध्ये लिपस्टीकचा वापर मोठा आहे आणि त्यातल्या या द्रव्याच्या संदर्भात अशा प्रकारचे निष्कर्ष जाहीर झाले तर लिपस्टीकच्या विक्रीवर मोठा गंभीर परिणाम होईल अशी भीती या उद्योगातल्या जाणकारांना वाटायला लागली आहे. म्हणून या उद्योगात काम करणार्‍या काही संशोधकांनी ट्रायक्लोसानच्या संबंधातील या संशोधनाला आक्षेप घेतला आहे. कॅलिङ्गोर्निया विद्यापीठा तील शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढताना दोन चुका केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रायक्लोसानचा हृदयाच्या स्नायूंवर होणारा परिणाम पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठातल्या संशोधकांनी उंदरांचा वापर केला आहे. म्हणजे हा प्रयोग उंदरांवर केला आहे. तो करताना ट्रायक्लोसान ची मात्रा जास्त वापरली आहे. प्रत्यक्षात लिपस्टीकमध्ये ट्रायक्लोसान त्यापेक्षा कमी प्रमाणात वापरले जात असते आणि विशेष म्हणजे ही लिपस्टीक ओठाला लावली जात असते. तिचा हृदयाशी काही संबंध येत नाही. 

ओठापासून हृदय खूप लांब असते. तेव्हा ट्रायक्लोसानच्या हृदयावर होणार्‍या परिणामां बाबतचे हे निष्कर्ष अतिशयोक्तीपूर्ण आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांना हा आक्षेप मंजूर नाहीत. उंदरांवर प्रयोग करताना मात्रा जास्त वापरली आहे परंतु निष्कर्ष लवकर हाती यावेत म्हणून ती जास्त वापरली आहे. प्रत्यक्षात लिपस्टीकमध्ये ती कमी असते ही गोष्ट खरी, परंतु एकदा ओठाला लिपस्टीक ङ्गासली की, तिचा परिणाम केवळ २० मिनिटे नव्हे तर २४ तास रहात असतो आणि तो कमी असला तरी अधिक काळ होत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओठाला लावलेल्या लिपस्टीकचा हृदयाशी काही संबंध नाही हे म्हणणे चूक आहे. ओठाला लावलेली लिपस्टीक केवळ हृदयापर्यंतच नव्हे तर तिथून झिरपत झिरपत शरीराच्या सगळ्याच अवयवापर्यंत जात असते. म्हणजे ती हृदयाला तर त्रासदायक ठरतेच, तर शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंनाही शिथिलता आणत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment