रहस्य लसलशीत भाज्यांचे

भाजी  बाजारात भाजी खरेदी करायला जातो तेव्हा ताजी, चमकदार आणि आकर्षक रंगांच्या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. लालबुंद टमाटो, हिरवीगार पालकाची पेंडी तसेच हिरवे वाटाणे, पांढरी शुभ्र कारली, अशा भाज्या पाहिल्या की मन आकृष्ट होते आणि चार पैसे जास्त गेले तर हरकत नाही पण अशा मन आकर्षुन घेणार्‍या भाज्या खरेदी केल्या पाहिजेत असे वाटते. अर्थात या भाज्यांना असा भाव यावा म्हणूनच त्या काही रसायनांचा वापर करून अशा चमकवलेल्या असतात. आपण त्यांना भावही देतो पण त्यांना चमक आणण्यासाठी काय काय केलेले असते याची आपल्याला नेमकी माहिती नसते.  ही रसायने जीवाला अपाय करणारी असतात. प. बंगालमधील जादवपूर विद्यापीठातले रसायन शास्त्राचे प्राध्यापक उत्पल रॉयचौधरी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे.  ही व्यापारी मंडळी भाज्यावर कसल्या कसल्या रसायनांचा संस्कार करतात पण त्यांचा ग्राहकांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम आहे याची ते पर्वा करीत नाहीत. 

या रसायनांत काही रसायने कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतातच पण त्यांच्यामुळे ङ्गळे आणि  भाज्यांच्या पोषणद्रव्यावरही विपरीत  परिणाम होत असतो. साधारणत: कॉपर सल्ङ्गेट, र्‍होडामाईन ऑक्साईड, मॅलाचाईट ग्रीन, कार्बाईड ही रसायने वापरली जात असतात. ही सर्व रसायने मेंदूवर गंभीर परिणाम करणारी असतात. त्यांच्या सेवनाने अल्झायमर्स, निद्रानाश असे मेंदूचे विकार होतात आणि ही सगळी रसायने कर्करोगासही कारणीभूत ठरतात. मॅलाचाईट ग्रीन हे रसायन मिरची, वाटाणा यांना वरून चोळले जाते. त्यामुळे त्यांचा रंग गडद हिरवा दिसायला लागतो. खरे तर हे द्रव्य कपड्यांसाठी वापरत असतात आणि या द्रव्यामुळे कर्करोग होत असतो. भेंडी, कारले आणि अन्य हिरव्या ङ्गळभाज्या छान दिसाव्यात म्हणून त्यांंना कॉपर सल्ङ्गेटमध्ये धुतले जाते.  

कॉपर सल्ङ्गेट हे ब्ल्यू व्हिट्रॉल म्हणून ओळखले जाते  आणि ते विषारी असते. कर्करोगास कारण असते. त्यालाच काही ठिकाणी नीळ असेही म्हटले जाते. त्याच्यामुळे मूत्रपिंड आणि यकृत यांनाही अपाय होतो. माणसाची वृद्धत्वाकडे वाटचाल  होण्यास कारणीभूत ठरणारी काही द्रव्ये या कॉपर सल्ङ्गेटमुळे शरीरात तयार होत असतात. काही  ङ्गळांना लालबुंद रंग यावा यासाठी र्‍होडॅमाईन बी वापरले जाते. ते त्वचेचा दाह करणारे असते. ते शेतात पिकावर ङ्गवारण्याच्या जंतुनाशकांत वापरलेले असते. याच कामासाठी कॅल्शीयम कार्बाईडही वापरले जाते. केळी आणि आंबे पिकवण्यासाठीही त्याचा वापर होतो. ही सारी प्रक्रिया ङ्गळांचे आणि भाज्यांचे ठोक व्यापारी करतात आणि  त्या भाज्या ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विक्रेत्यांना या रसायनांचे दुष्परिणाम माहीत नसतात. आपण काय विकत आहोत हे त्यांना कळत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment