मूठभर पिस्ता उपयुक्त ठरेल

सध्या आपले जीवनमान वाढत चाललेले आहे आणि आपल्या खाण्यामध्ये तेलगट त्याचबरोबर चरबी वाढवणारे अन्नही जास्त होत आहे. माणूस थोडासा श्रीमंत झाला की, एरवी शेंगदाणे खाण्याच्या ऐवजी सहजच काजू खायला लागतो आणि शेंगदाण्यापेक्षा काजू चवीला छान लागतात म्हणून चार काजू जास्त खाल्ले जातात. असे असले तरी काजूमध्ये शेंगदाण्यांपेक्षा जास्त तेल असते आणि त्यामुळे शरीरात चरबी वाढण्याची शक्यताही जास्त असते. मात्र जीभेची मागणी पूर्ण करता करता काजू, पिस्ता, बदाम असा सुकामेवा सहजच आपल्या पोटात जायला लागतो. हृदयविकार आणि जाडी या गोष्टी अशा श्रीमंत लोकांमध्येच जास्त आढळतात. त्याचे हे एक कारण आहे. म्हणून हृदयविकारावर बोलताना डॉक्टर मंडळी सुकामेवापासून सावध राहण्याचा इशारा देता आणि त्यांच्या पासून सावध राहण्याविषयी बजावत असतात.

एकंदरीत काजू, बदाम, पिस्ता हे आपले शत्रू समजावेत असा सल्ला हृद्रोग्यांना दिलेला असतो. परंतु अमेरिकेच्या काही शास्त्रज्ञांनी आता नवीनच संशोधन केलेले आहे. रोज मूठभर पिस्ता खाल्ल्याने ङ्गायदा होतो असे त्यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे हा पिस्त्याचा खुराक मर्यादित असावा असे तर त्यांनी म्हटले आहेच, परंतु या खुराकाचा चांगला ङ्गायदा हृदयालाच होतो असेही दाखवून दिले आहे. अतीशय तणावामुळे किंवा तीव्र स्वरुपाच्या तणावामुळे हृदयावर जे परिणाम होतात ते परिणाम कमी करण्याची क्षमता या मूठभर पिस्त्या-मध्ये असते असे या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलेले आहे. अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे पिस्त्याचे महत्व विषद केलेले आहे. त्यांच्या या संशोधनाला अर्थातच निरीक्षणाची सुद्धा जोड आहे. या निरीक्षणाच्या अंती हे शास्त्रज्ञ अशा निष्कर्षाप्रत आलेले आहेत की, तीव्र स्वरुपाच्या तणावामध्ये माणसाची छाती धडधड करतेे. कारण हृदयाचे ठोके वाढायला लागतात आणि ते ठोके असे वेगवान झाले की, शरीरावर अनेक प्रकारची विपरीत परिणाम होतात.

तेव्हा दररोज साधारणपणे दहा ते बारा पिस्ते नियमाने खाणारी व्यक्ती या परिणामां पासून मुक्त राहू शकते. कारण तणावाच्या स्थितीत वेगाने होणारी छातीची धडपड पिस्त्याच्या खुराक्याने टळत असते. या खुराकाचा शरीरावर असा काही परिणाम होतो की, तणावाच्या स्थितीत छातीचे ठोके वाढत नाहीत आणि ते वाढल्यामुळे होणारे जे संभाव्य परिणाम असतात ते परिणाम टळतात. दुसरा एक ङ्गायदा म्हणजे या खुराकामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. विशेषत: ज्या लोकांना छोट्या-मोठ्या तणावांना रोजच तोंड द्यावे लागते अशा लोकांना हे पिस्ते उपयुक्त ठरतात. असे रोजचे प्रसंग म्हणजे ठरलेल्या वेळात काम पूर्ण करण्याचा दबाव, जो प्रामुख्याने पत्रकारांच्या आयुष्यात असतो. त्याशिवाय भाषण करण्याच्या आधी येणारा तणाव. या तणावामुळे होणारे परिणाम पिस्त्यामुळे टळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment