पौगंडावस्थेत आहार सांभाळा

तरुण मुलींच्या मनामध्ये, विशेषत: पौगंडावस्थेतील मुलींच्या मनामध्ये सुंदर दिसण्याची तीव्र इच्छा असते. परंतु वय वर्षे १३ ते १९ या वयोगटात असताना खाण्यावर नियंत्रणे ठेवली नाहीत तर शरीरावर असे काही गंभीर परिणाम होतात की, ते जन्मभर टिकतात. विशेषत: लठ्ठपणा. लठ्ठपणा याच काळात वाढतो आणि तो कायम राहतो. हे वय उलटल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी या वयात वाढलेली जाडी पुन्हा जन्मात कधी कमी होत नाही. तेव्हा या वयोगटातल्या मुलींनी खाण्याची पथ्ये ङ्गार कसोशीने पाळण्याची गरज असते. या संबंधात पाळावी लागणारी पथ्ये खालीलप्रमाणे आहेत. 

१) कर्बयुक्त पदार्थ टाळू नका – शरीरावर कर्बोदकांचा वाईट परिणाम असतो असे सर्वसाधारणपणे मानले जाते. परंतु कर्बोदके टाळता कामा नयेत. कारण कर्बोदके हा मेंदूचा खुराक आहे. केवळ एवढेच नव्हे तर कर्बोदके हा मेंदूचा खास खुराक आहे. कर्बोदके खाण्याने शरीर लठ्ठ होत नाही. पण न खाण्याने मेंदू मात्र क्षीण होऊ शकतो.

२) किती खाता याला महत्व – काय खावे आणि काय खाऊ नये याची ङ्गार पथ्ये या वयात पाळण्याची गरज नाही. कारण हे वाढीचे वय असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या अन्न घटकांची शरीराला गरज असते. त्यातल्या त्यात लठ्ठपणा वाढविणारे चरबीयुक्त पदार्थ, तळलेले तेलगट पदार्थ, अति गोड पदार्थ साधारणपणे टाळावेत. ङ्गार टाळता आले नाहीत तर कमी खावेत. पण काय खाऊ नये याच्या पथ्यावर ङ्गार लक्ष देण्यापेक्षा किती खावे आणि किती खाऊ नये यावर जास्त लक्ष द्यावे. म्हणजेच काय खाता यापेक्षा किती खाता याला या वयोगटात महत्व आहे. 

३) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकङ्गास्ट टाळू नका. ब्रेकङ्गास्ट हा शरीरातल्या चयापचय क्रिया सुघटित करण्यास आणि कार्यक्षमता टिकवण्यास आवश्यक असतो. तेव्हा न्याहरी टाळू नका. ४) शीतपेये टाळा – शीतपेयांमध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तर ती टाळली पाहिजेतच. परंतु शीतपेयांमध्ये कसलीही पोषक द्रव्ये नसतात आणि शरीराला, मनाला तात्पुरती उत्तेजना देणारे काही घटक असतात. म्हणून ही पेये टाळली पाहिजेत. या पेयांमुळे ताबडतोब शरीर, मनाला उत्तेजना मिळते हे खरे पण ती उत्तेजना त्याच वेगाने कमी सुद्धा होत असते आणि शीतपेयांतले अन्य काही घटक शरीरावर कायमचे काही दुष्परिणाम सोडून जात असतात. हे दुष्परिणाम विशेष करून ङ्गसङ्गसणार्‍या पेयांमध्ये जास्त आढळतात. 

५) बाजारातून विकत आणलेले प्रक्रियायुक्त आणि कृत्रिम अन्न पदार्थ खाणे टाळले पाहिजे. विशेषत: ज्या अन्न पदार्थात कृत्रिम शर्करा वापरलेली असते ते अन्नपदार्थ टाळले पाहिजेत. कारण त्या शर्करेमुळे आपली साखर खाण्याची किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा तीव्र होत असते. 

६) एकदा किंवा दोनदा भरपूर जेवण्यापेक्षा तीन वेळा थोडे थोडे जेवावे. हे जेवण ङ्गारच कमी असावे आणि त्या तीन जेवणांमध्ये अल्पोपहार घ्यावा. साधारणपणे झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दर दोन तासाला थोडे काही तरी खावे. त्यामुळे आपली कार्यक्षमता टिकत असते. मात्र हे करताना रात्री आठ नंतर काहीही खायचे नाही हा नियम कसोशीने पाळा.
 ७) हे सगळे करताना व्यायाम अतिशय आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment