जादा डास चावण्यामागे अंगगंध हे कारण ?

डास सर्वांनाच चावतात पण त्यातही एखाद्या व्यक्तीला जरा अधिकच चावतात यामागे काय कारण असावे याचे संशोधन रॉकफेलर विद्यापीठातील कॉनोर मॅकमेनिमेन यांनी केले आहे. त्यांना या संशोधनातून असे आढळले की कांही विशिष्ट माणसांना जादा डास चावण्यामागे त्यांच्या शरीरातून निघणारा एक खास गंध किंवा वास कारणीभूत आहे. या गंधामुळे डास अशा व्यक्तींकडे जादा आकर्षित होतात असे त्यांचे म्हणणे आहे.

यासाठी त्यांनी माणसाच्या शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईड, शरीराची उष्णता आणि शरीर गंध यांचा अभ्यास केला तेव्हा ही तिन्ही कारणे विविध संवेदना निर्माण करतात असे त्यांना आढळले. त्यावर त्यानी पिवळा ताप पसरविणार्‍या डासातील जनुके म्युटेट केली. या डासांना माणसाच्या शरीराच्या तापमानाइतक्या तापविलेल्या इलेक्ट्रीक प्लेट असलेल्या खोलीत सोडले गेले. या प्लेटमधून जेव्हा कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडला तेव्हा बाकीचे डास तिकडे आकर्षित झाले नाहीत मात्र म्युटेट केलेले डास मात्र त्यावर तुटून पडले असे दिसले.

यावरून असे अनुमान काढण्यात आले की, ज्यांच्या शरीरातून कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडत नाही त्यांच्याकडे कीटक कमी आकर्षित होतात मात्र ज्यांच्या शरीरातून हा वायू बाहेर पडतो व त्यामुळे जो विशिष्ट गंध येतो त्याकडे मात्र कीटक जादा आकर्षित होतात व म्हणूनच त्यांना डास अधिक चावतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment