इंटरनेट मोफत पण एकही सायबर गुन्हा नसलेला एस्टोनिया देश

युरोपातील एस्टोनिया या चिमुकल्या देशाने आर्थिक विकास प्रगतीचा वेग कमालीचा राखून प्रसिद्धी मिळविली आहे. विशेष म्हणजे या देशात इंटरनेट सुविधा मोफत असूनही आजपर्यंत एकही सायबर गुन्हा येथे नोंदविला गेलेला नाही. या देशातील प्रत्येक सुविधा ऑनलाईन आहे. कर भरणे, पार्किंग भाडे, डॉग बोर्डिंग अश्या सर्व सुविधांचे पैसे ऑनलाईन भरले जातात. हा देश जगात मोफत इंटरनेट बद्दल प्रसिद्ध आहेच पण या देशात अनेक बाबी खास म्हणाव्या अश्या आहेत.

सोविएत युनियन मधून विभक्त होऊन बाहेर पडल्यावर या देशाने अतिशय वेगाने आर्थिक प्रगती केली आहे. २००० सालात येथे शाळा महाविद्यालयात मोफत इंटरनेटची सुरवात झाली. येथील चलन युरो आहे. येथे सार्वजनिक वाहतूक सुद्धा मोफत आहे. मात्र हा निर्णय घेण्याअगोदर जनमत घेतले गेले होते.

इंटरनेटचा योग्य वापर व्हावा यासाठी सरकार वेळोवेळी जनजागृती मोहिमा राबविते. येथे स्थानिक तसेच विदेशी गँबलिंग साईट्स आहेत पण त्यासाठी स्पेशल परवाना घ्यावा लागतो. या देशात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक असून हे प्रमाण ८४ पुरुषांमागे १०० महिला असे आहे. या देशाचे आणखी एक विशेष म्हणजे येथे लोकसंख्येपेक्षा जास्त पर्यटक येतात.

या देशात अति प्राचीन असे १६ व्या शतकातील लाकडी चर्च आहे. मात्र येथील नागरिक चर्च मध्ये फारसे जात नाहीत. देशात साक्षरतेचे प्रमाण ९९.८ टक्के आहे. ऑनलाईन व्होटिंगची सुरवात याच देशात सर्वप्रथम झाली.