दत्तक मातृत्वाच्या प्रमाणात वाढ

लंडनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये दत्तक मातृत्वाच्या प्रमाणात भरपूर वाढ झाली असल्याचे आढळले आहे. ब्रिटन, अमेरिका, जपान, जर्मनी अशा संपन्न देशांमध्ये महिलांची आणि पुरुषांचीही प्रजनन क्षमता घटत चालली आहे. त्यामुळे मुलांना जन्म देण्यास असमर्थ ठरलेल्या शेकडो दांपत्यांना दत्तक मातृत्वाचा शोध अधिक दिलासा देणारा ठरला आहे. परंतु लंडनमध्ये दत्तक मातृत्वाच्या म्हणजे सरोगेट मदरहुडच्या कल्पनेला कायद्याची अनेक बंधने घालण्यात आलेली आहेत. त्यामुळे ब्रिटनमधली अपत्यहीन दांपत्ये दत्तक माता मिळविण्या साठी भारताकडे धाव घेत आहेत. भारतात दत्तक मातृत्वाच्या उपचारामध्ये चांगलेच संशोधन झालेले आहे, भारतातल्या महिला आपले गर्भाशय नऊ महिन्यांसाठी भाड्याने देण्यास उत्सुक असतात, गरजूही असतात, त्या शक्यतो मद्यपान किंवा धूम्रपान करत नाहीत. त्यामुळे भारतातल्या महिलेच्या गर्भाशयात आपले मूल वाढावे, अशी ब्रिटन मधील महिलांची ङ्गार इच्छा असते.

भारतातल्या अनेक महिला साधारण १६ हजार ते ३२ हजार पौंड म्हणजे जवळपास दीड ते तीन लाख रुपयांमध्ये ही जबाबदारी स्वीकारतात. अशा एखाद्या मुलाला जन्म दिला की, हे दोन-तीन लाख रुपये आणि वर बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम एकदम मिळून गेली की, अशी गरीब कुटुंबे जन्माची कर्जमुक्त होऊन जातात. त्यातल्या कित्येक कुटुंबांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होते. २००२ सालपासून भारतात या संबंधात कायद्यात झालेले बदल या व्यवसायाला चालना देणारी ठरले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय भारतात भरभराटीला आलेला आहे. केवळ लंडनमध्ये या कामांत गुंतलेल्या भारतीय एजंटांची संख्या गेल्या चार वर्षामध्ये पाच पटीने वाढली आहे.

जगातल्या एकेका देशामध्ये सरोगेट मदरहुड म्हणजे दत्तक मातृत्वाच्या कल्पनेला हळूहळू कायदेशीर मान्यता मिळायला लागली आहे आणि त्यामुळे भारतातला हा उद्योग अतीशय वेगाने वाढत चालला आहे. गुजरातमध्ये दत्तक मातृत्वाचे प्रयोग करणारी काही केंद्रेच विकसित झालेली आहेत. अमेरिकेतील लोकांना तर भारतातला हा दत्तक मातृत्वाचा दर ङ्गारच क्षुल्लक वाटतो. अशा प्रयोगात गुंतलेल्या महिलेला डॉलरच्या चलनात ङ्गार तर पाच हजार डॉलर्स द्यावे लागतात, पण अमेरिकेत हाच प्रयोग केल्यास एक लाख डॉलर्स लागतात. इतका भारतातला प्रयोग स्वस्त तर आहेच, पण मूल निरोगी होण्याची खात्री देणाराही आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment