हा रक्तगट असेल तर टक्कल पडण्याचे चान्सेस जादा

जमशेदपूर – टक्कल अनुवंशीक असते असा समज आहे. गळणारे केस आणि पडलेले टक्कल ही जगातील असंख्य पुरूष आणि महिलांची समस्या आहे. आजपर्यंत टक्कल पडण्यास जनुकेच कारणीभूत असतात असे सांगितले जात होते मात्र जमशेदपूर येथील त्वचारोग तज्ञ डॉ.आर.पी. ठाकूर यांनी केलेल्या संशोधनात अनुवंशिकतेबरोबरच ज्यांचा रक्तगट अे पॉझिटिव्ह आहे त्यांना टक्कल पडण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. ठाकूर गेली सात वर्षे यावर संशोधन करत आहेत.

डॉ. ठाकूर सांगतात, डोक्याचे केस गळून टक्कल पडायला लागले की माणूस चिंताग्रस्त होतो कारण टक्कलावर अजून तरी खात्रीशीर उपाय नाही. त्यामुळे या विषयावर संशोधन करण्याचे ठरविले. चंदिगढ येथील प्लॅस्टीक सर्जन तेजिंदर भट्टी यांनीही याच विषयावर संशोधन केले आणि त्यात असे आढळले की ज्यांचा रक्तगट अे आहे त्यांच्यात बी व्हिटॅमिन व त्यातही बी सेव्हन(बायोटिन) शोषून घेण्याची क्षमता कमी असते. यामुळे ठराविक वयानंतर त्यांच्या केसांची जाडी आणि वाढ कमी होत जाते. माणसाला पाच मिलिग्रॅम बाटोटिनची दररोज गरज असते.

विशेष म्हणजे ८० टक्के लोकात टक्कल पडण्याचे जीन्स किवा जनुके आईकडून येतात. आईकडचे आजोबा किवा मामा टकलू असतील तर संबंधिताला टक्कल पडण्याचे चान्सेस अधिक असतात मात्र आईला टककल येत नाही असेही ठाकूर यांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment