लठ्ठपणातून वाढत आहे वंध्यत्व

वाढत्या समृद्धीबरोबर लोकांचे वजनही वाढत चालले आहे आणि लठ्ठपणाही वेगाने गती घेत आहे. वाढत्या जाडीमुळे अनेक विकारांना निमंत्रण मिळते. पण विशेष करून महिलांमधल्या वाढत्या जाडीचा पहिला परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. अधिक जाडी वाढणार्‍या महिलांमध्ये प्रजोत्पादन व्यवस्थेत अनेक दोष निर्माण होतात. मासिक पाळी अनियमित होते. एवढेच नव्हे तर शरीरात जास्त चरबी जमा होऊन अपत्यप्राप्ती अशक्य होऊन बसते. चांगलेचुंगले खायला मिळाले आणि व्यायामा कडे दुर्लक्ष झाले की, बघता बघता मुली लठ्ठ व्हायला लागतात आणि त्याकडे कोणाचेच लक्ष रहात नाही. जाडी वाढायला वेळ लागत नाही, पण ती कमी करायला खूप वेळ लागतो. तसेच ती कमी करण्यासाठी खूप सायास करावे लागतात.

एवढे करूनही ती कमी होईल याची काही खात्री देता येत नाही. म्हणून मुली वयात आल्यापासूनच त्यांची जाडी ङ्गार वाढणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. तसे न दिल्यास अपत्य होण्याची शक्यता दुरावत जाते. त्यावर उपाय म्हणून इन्व्हर्टो ङ्गर्टिलायझेशनचा प्रयोग केला आणि त्या मार्गाने अपत्य प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न केले तर त्याही प्रयोगात काही अडचणी येतात. अशी एखादी अधिक वजनाची महिला गरोदर राहिली तरीही तिच्या गरोदरपणात बर्‍याच गुंतागुंती निर्माण होतात. कधी कधी याच अवस्थेत मधुमेह बळावण्याची शक्यता असते. त्याशिवाय रक्तदाब वाढतो, लघवीत दोष निर्माण होतो, मूत्रमार्गात जंतू संसर्ग होऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्ङ्गेक्शनचा त्रास होतो. याच काळात निद्रानाशाची भीती असते.

गर्भपात, अवेळी प्रसूती किंवा मृतावस्थेत बालक जन्माला येणे हेही त्रास संभवतात. तेव्हा प्रजनन काळात महिलांनी आपले वजन वाढणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. दररोज किमान ३० मिनिटे भरभर चालणे, काही प्रमाणात योगासने आणि तेलकट, गोड अन्न कमी खाणे यातून वजन आणि जाडी मर्यादित ठेवता येते. प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची आंतरिक इच्छा असते. मूल झाल्याशिवाय तिच्या आयुष्याला काही अर्थ नाही, असे महिला मानतात. दुर्दैर्वाने काही महिलांना काही दैवजात दोषांमुळे मूल होऊ शकत नाही. परंतु अनेक महिलांना लठ्ठपणामुळे मूल होत नसेल तर त्यांचा हा दोष त्यांनी आपल्या हातून ओढवून घेतलेला ठरतो. अशावेळी सावध राहिले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment