चेहरा आरोग्याचा आरसा

आपली त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा असतो. त्यातल्या त्यात चेहर्‍याची त्वचा आपले आरोग्य कसे आहे हे दर्शवीत असते. जुन्या काळातील आयुर्वेदासारख्या सगळ्या जुन्या उपचार पध्दतींनी ही गोष्ट मान्य केलेली आहे. चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या ऍक्युपंक्चर किंवा ऍक्युप्रेशर अशा जुन्या उपचार पध्दतीत सुध्दा चेहरा बघून आरोग्याचे निदान केले जाते. आयुर्वेदामध्ये जशी नाडी परीक्षा आहे. तेवढी ही चेहर्‍याची परीक्षा शास्त्रशुध्द आणि नेमकी नाही. परंतु आरोग्याच्या काही तक्रारींचा अंदाज चेहर्‍याच्या त्वचेवरून येतो असे अनेक अनुभवी डॉक्टर आणि वैद्यांचे म्हणणे आहे. आपल्या शरीरातल्या अवयवांमध्ये जे काही घडते त्याची प्रतिक्रिया चेहर्‍यावर उमटते आणि चेहर्‍यावरून जे दिसते त्याचाच विस्तार शरीरातल्या अवयवांमध्ये झालेला असतो असे चिनी लोक मानतात.

आधुनिक काळातले त्वचारोग तज्ञ देखील त्वचेवरच्या विविध डागांवरून रुग्णाच्या कोणत्या अवयवात काय बदल झालेले आहेत हे हेरता येते असे मान्य करत आहेत. काही डॉक्टरांनी तर चेहर्‍यावरचा कोणता बदल शरीरातल्या कोणत्या दोषाचा द्योतक आहे याचे काही ठोकताळे बसवलेले आहेत. तोंडामध्ये होणारे बदल किंवा दिसणारे दोष हे पोटातल्या विकाराचे द्योतक असतात. अपचन झालेल्या रुग्णाच्या तोंडाला दुर्गंध येतो. पोटातल्या काही विकारांचे प्रतिबिंब तोंड येण्यात उमटत असते. मूत्रपिंड आणि मूत्राशय यात काही दोष असतील तर ते दोष हनुवटीवर उमटतात. त्याच बरोबर लिव्हरमध्ये काही दोष असेल तर पापण्यामध्ये बदल होतात. काही लोकांना या गोष्टी मान्य नाहीत परंतु शेवटी हे ठोकताळे आहेेत.

काही लोकांच्या चेहर्‍यावर मानेच्या मागे त्वचा ङ्गिकट पडायला लागते तेव्हा काही विशिष्ट आजार बळावत असतात. काही लोकांच्या चेहर्‍यावरच्या काही बदलांतून अनेक डॉक्टरांना तो मधुमेहाला बळी पडण्याची शक्यता लक्षात येते. चेहर्‍यातले काही बदल विशेषत: कानाच्या मागचे बदल हे रुग्ण ज्यादा अन्न प्राशन करत असल्यचे द्योतक असते असे काही डॉक्टरांच्या लक्षात आले आहे. सतत पैशाच्या मागे लागणारे लोक, दारू पिणारे लोक, रक्तदाब वाढलेले लोक चेहर्‍यावरून सरळ सरळ ओळखू येतात मात्र त्यासाठी अनुभवी नजर लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “चेहरा आरोग्याचा आरसा”

  1. dilelya mahiti baddal khup khup aabhar mi mazya miss sathi he upyogat aanat ahe yacha reesult changla ahe

Leave a Comment