चाळिशीला घाबरतो कोण ?

40'sचाळिशी आली की डोळ्याला चाळिशी लागते. केस पांढरे व्हायला लागतात. काही लोक, आता वय झालं, असे म्हणायला लागतात. पूर्वी आयुर्मान कमी होते. त्यामुळे लोक पन्नाशी आली की अर्ध्या गौर्‍या मसणात गेल्या असे म्हणायचे. पण आता आयुर्मान वाढले आहे. पूर्वी ते ३९ वर्षे होते. आता ते ५६ वर्षें आहे आणि येत्या दशकात ते ८० वर्षे होणार आहे. म्हणजे आता ज्यांनी चाळिशी गाठली आहे ते ८० व्या वर्षापर्यंत जगणार आहेत. म्हणजे ४० वे वर्ष हे काही उतार वय नव्हे. या लोकांना साठी गाठली तरी ङ्गार तर वयस्कर म्हणावे लागेल. साठीत ही अवस्था तर हे लोक चाळिशीला उतार वय कशाला समजतील ? वयाचे असे प्रश्‍न महिलांसाठी ङ्गार जिव्हाळ्याचे असतात. त्यांच्यात वय दिसू नये, लवकर म्हातारपण येऊ नये यासाठी डाएटिंग केले जाते. काही महिला योगासने करतात. काही वजन वाढू नये यासाठी अनेक गोष्टी करायला लागतात. अनेक पथ्ये पाळतात. काही महिलांना रोज काही तरी खेळ खेळण्याची सवय असते. आपण चाळिशीच काय पण पन्नाशी गाठली तरी ङ्ग्रेश आहोत, सडसडीत आहोत आणि आपल्या मनावर, शरीरावर वयाचा काही परिणाम झालेला नाही हे त्यांना दाखवायचे असते. या उपरही काही परिणाम झालेला दिसला तरी त्या झालेला परिणाम मान्य करीत नाहीत.

हॉलीवूडची अभिनेत्री कॅमेरॉन दियाझ हिने, चाळिशीत प्रवेश म्हणजे आपल्या जीवनाच्या उत्तम वयोगटात प्रवेश असे म्हटले आहे. अर्थात ही भावना व्यक्त करण्यासाठी हॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्रीची साक्ष काढण्याची काही गरज नाही. मुंबई, पुणे, दिल्ली अशा अनेक शहरांत आपण महिलांचा कानोसा घेतला तर आपल्याला अशीच भावना व्यक्त झालेली ऐकायला मिळेल. कारण वय झालेले कोणालाच सहन होत नसते. काही महिलांनी तर आता चाळिशी हीच जीवनातली तारुण्याची अवस्था होय असे म्हटले आहे. विशीपेक्षा चाळिशीतच महिला अधिक तरुण असल्याचा आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा अनुभव घेत असतात असे एका ब्यूटी पार्लरच्या संचालिकेने म्हटले आहे. उलट काही महिला चाळिशीतच अगदी विशीतल्या आतील मुलींपेक्षा उत्साही आणि टुणटुणीत असतात असे तिने अनुभवले आहे.

एका उद्योजक महिलेने तर ङ्गार चांगले म्हटले आहे. ती म्हणते, वयाची ४२ वर्षे झाली म्हणून मला आता साड्या नेसल्याच पाहिजेत आणि आपण आजीसारखे राहिले पाहिजे असे काही नाही. जोपर्यंत माझी स्कीन मला माझं वय झालं असल्याचं सूचित करीत नाही तोपर्यंत मी वाटेल ते ड्रेस घालू शकते. सौदर्य तज्ञ असलेल्या महिलेने याबाबत ङ्गारच परिपक्व मत मांडलं आहे. तिने म्हटले आहे. चाळिशी गाठलेल्या महिलेला जीवनाचा अनुभव आलेला असतो. त्या अनुभवाने तिचा आत्मविश्‍वास वाढलेला असतो. तो तिच्या चेहर्‍यावर प्रकट होत असतो. तिच्या वागण्या बोलण्यात व्यक्त होत असतो. तो आत्म विश्‍वास तिचे रूप आणि व्यक्तिमत्त्व वाढवत असतो. चाळिशीतली महिला विशीतल्या मुलीसारखी तरुण दिसत नसते. तसा अट्टाहास करणेही चुकीचे ठरते. पण तिच्या अनुभवातून आलेल्या आत्मविश्‍वासातून तिचा उत्साह वाढतो आणि तो तिच्या वागण्या बोलण्यात दिसायला लागला की ती सुंदर दिसायला लागते. या उत्साहाला ङ्गिटनेसची जोड मिळाल्यास तर मग विचारूच नका.

श्रीदेवी अजूनही आपल्या मुलीबरोबर रोज टेनिस खेळते आणि नियमाने योगासने, प्राणायाम करते. त्याने तिचा शरीराचा बांधा तारुण्या सारखा आहे. उत्साहाला अशा दिसण्याची जोड मिळाली की अशा व्यक्तीच्या सहवासात जवानी का अहसास होत राहतो. या मेन्टनन्सला बरेच लोक खाण्यापिण्याची पथ्येही जोडतात आणि मग त्यांच्या शरीरावर लवकर सुरकुत्या उमटत नाहीत. अर्थात हे सारे खरे पण आनंदी राहणे हे तरुण दिसण्या साठी ङ्गार आवश्यक असते. त्यासाठी आपल्या मनालाच सतत आनंदी राहण्याची सवय लावली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment