अन्नाचा मनावर गाढ परिणाम

हिंेदीमध्ये ङ्गार जुन्या काळापासून एक म्हण रूढ आहे. ‘जैसो खायो अन्न, वैसा होगा मन्न | जैसे पियोगे पानी, वैसी होगी वानी ॥जसे अन्न खाल तसे मन होईल, जसे पाणी प्याल तशी वाणी होईल. अर्थात ही केवळ म्हणच आहे की, व्यवहारात तसा अनुभव येतो हा प्रश्‍न आहे. आपल्या पूर्वजांनी असे काही सांगितले की, आपला त्यावर सहजासहजी विश्‍वास बसत नाही. परंतु त्यांनी जे सांगितले तेच परदेशातल्या एखाद्या विद्यापीठात सिद्ध झाले की मात्र आपल्याला ते पटते. न्यूझीलंडच्या युनिव्हर्सिटी ऑङ्ग ओटॅगो या विद्यापीठामध्ये खाल्ले जाणारे अन्न आणि ते खाणार्‍यांची मन:स्थिती यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. म्हणजे एखादे अन्न खाल्ल्यानंतर त्याचा खाणार्‍यांच्या मनावर काय परिणाम होतो आणि त्याची मन:स्थिती कशी होते, याची निरीक्षणे करण्यात आली.

दारू प्यायल्यानंतर माणसाला नशा येते आणि नशेत त्याची मन:स्थिती बिघडते. हा मद्याचा ताबडतोब जाणवणारा एक परिणाम आहे. परंतु त्यातून एक गोष्ट दिसून येते की, आपल्या खाण्या पिण्याच्या आपल्या मन:स्थितीवर कमी-जास्त का होईना परिणाम होतोच. मद्याचा परिणाम ताबडतोब होतो आणि तीव्र असतो. तसाच अन्य अन्नपदार्थांचा असेलच, असे या शास्त्रज्ञांना वाटले. कदाचित हा परिणाम दारू एवढा तीव्र नसेल आणि ताबडतोब जाणवणाराही नसेल. तो उशीरा जाणवणारा आणि कमी प्रमाणात असणारच. असे गृहित धरून केलेल्या प्रयोगाअंती या शास्त्रज्ञांचे ठाम मत झाले की, ‘हेल्दी ङ्गूड हेल्दी मूड’ म्हणजे ङ्गूड नुसार मूड बदलतो. न्यूझीलंडमधल्या या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग करताना एक गोष्ट चांगली केली की, प्रयोगासाठी चांगले अन्न निवडले.

विशेषत: आपल्या मन:स्थितीवर आणि प्रकृतीवर सात्विक परिणाम करणारी ङ्गळे आणि भाज्या यांच्यावर प्रयोग केले. तेव्हा त्यांना असे आढळले की, अन्न सेवन करणारी व्यक्ती विशेषत: तरुण लोक जितकी ङ्गळे आणि भाज्या जास्त खातील तेवढे ते शांत, आनंदी आणि उत्साही होतील. या विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील संशोधक डॉ. तामलीन कोनर आणि डॉ. बोनी व्हाईट यांनी हे प्रयोग केले आहेत. नित्याच्या खाण्यातील अन्न पदार्थ आणि त्यांचा आपल्या भावनांवर होणारा परिणाम असा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांनी या प्रयोगासाठी २८१ तरुणांची निवड केली. या तरुणांचे सरासरी वय २० वर्षे होते. या सर्वांशी त्यांनी इंटरनेटवरून संपर्क साधला आणि सलग २१ दिवस त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि त्यांच्या आहारातील अन्न पदार्थ यांच्या नोंदी ठेवल्या. त्यांनी ङ्गळे किती खाल्ली, भाज्या कोणत्या आणि किती खाल्ल्या यांची तर माहिती त्यांनी गोळा केलीच, परंतु प्रयोगात सहभागी झालेल्या या तरुणांचे नेमके वय, वंश, वजन, उंची आणि लिंग यांच्या संदर्भात त्यांच्या खाण्याच्या सवयींचे विश्‍लेषण केले. यातल्या ज्या तरुणांना खाण्या-पिण्याची काही शिस्त नव्हती त्यांना या प्रयोगातून वगळण्यात आले.

त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांमध्ये नऊ ङ्गळे आणि नऊ भाज्या अशी १८ वस्तूंची यादी दिलेली होती. त्यातली कोणती भाजी किंवा कोणते ङ्गळ खाल्ल्यानंतर त्याच दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी त्यांची मन:स्थिती कशी होते याची चौकशी करण्यात आली. या निरीक्षणात आणखी एक तपशील होता, त्यामध्ये या तरुणांनी आपण ङ्गळ कसे खाल्ले हे सांगायचे होते. निव्वळ ङ्गळ खाल्ले की ङ्गळाचा रस प्राशन केला याला संशोधकांनी महत्व दिले होते. कारण ङ्गळाचा रस प्राशन केल्यामुळे ङ्गळ खाण्याचा परिणाम कमी होतो असे या संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र एकंदरीत ङ्गळे आणि भाजी खाण्याचे आपल्या मन:स्थितीवर चांगले परिणाम होतात असा निष्कर्ष त्यांना काढता आला. परंतु शेवटी प्रश्‍न असा निर्माण होतो की, चांगला मूड येण्यासाठी नेमकी किती ङ्गळे आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत? त्यांच्या मते दिवसातून किमान सात वेळा हे खाल्ले गेले पाहिजे, तरच त्याचा मन:स्थितीवर चांगला परिणाम होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment