मुकेश अंबानी यांच्यासोबत डेट वर जाण्याच्या प्रश्नाला नीता अंबानींनी दिले हे उत्तर


रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी व नीता अंबानी या दाम्पत्याचे नाव जगातील सर्वांत श्रीमंत दाम्पत्यांच्या यादीत आवर्जून घेतलं जातं. व्यावसायिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या असताना स्वत:साठी आणि पती किंवा पत्नीसाठी वेळ काढणं कठीण होऊन जातं. अशातच एका मुलाखतीत नीता अंबानी यांना प्रश्न विचारला गेला की, तुम्ही आणि मुकेश अंबानी इतर सामान्य कपल्ससारखे डेटवर जाता का? असा प्रश्न त्यांना फेमिना या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला होता. नीता त्यावर म्हणाल्या, माझ्या आणि मुकेश अंबानींच्या लग्नाला ३५ हून अधिक वर्षे झाली आहेत आणि आम्ही आजही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो.

ते माझे सर्वांत चांगले मित्र आहेत. नुकताच माझा वाढदिवस आम्ही संपूर्ण कुटुंबीयांसोबत साजरा केला होता, असे त्यांनी पुढे सांगितले. बऱ्याचदा आमचे प्लॅन हे अचानकच ठरतात. मुकेश कधी अचानकच म्हणतात की चला कॉफी प्यायला जाऊ आणि आम्ही तेव्हा एकमेकांसोबत निवांत वेळ घालवतो, असे त्या म्हणाल्या. सर्वसामान्य जोडप्याप्रमाणेच आम्हीसुद्धा भेळपुरी, शेवपुरी खाण्यासाठी घराबाहेर पडतो. कारण आम्हा दोघांनाही स्ट्रीट फूड फार आवडते, असे त्यांनी सांगितले. मुकेश अंबानी कामाच्या व्यापामुळे घरी कितीही उशिरा आले तरी नीता त्यांच्यासोबत जेवण्यासाठी थांबतात.