हृदयापासून हृदयासाठी

आज संगणक हे साधन आपल्या खिशात येऊन बसले आहे. पूर्वी ते ङ्गार मोठे होते. दहा ङ्गूट लांब आणि दहा ङ्गूट रुंद अशा एका खोलीमध्ये हा अजस्त्र संगणक बसवलेला असे. पण आता मात्र तो लहान लहान होत खिशामध्ये येऊन बसला असला तरी त्याला त्यापेक्षाही छोटा करण्याचे प्रयास जारी आहेत. हीच गोष्ट हृदयविकार असणार्‍या रुग्णांना पुरवल्या जाणार्‍या पेसमेकरच्या बाबतीत घडलेली आहे. आपण बर्‍याच लोकांमध्ये पेसमेकर बसवलेला पाहतो. खरे म्हणजे तो बसवला आहे हे कळण्याची काही सोय नसते. तो पेसमेकर बॅटरीवर चालत असल्यामुळे ती बॅटरी मात्र शरीरावर असते आणि तिला अधूनमधून चार्ज करावे लागत असल्यामुळे काढघाल करावी लागते आणि तिच्यामुळे पेसमेकर बसवलेला माणूस ओळखू येतो.

यापूर्वीची स्थिती मात्र ङ्गारच वाईट होती. १९५८ साली पहिला पेसमेकर बसवला गेला तो ४५ किलो वजनाचा होता आणि तो बाळगणार्‍याला सोबत एक गाडीच घेऊन जावे लागत असे. पुढे पुढे मात्र हा पेसमेकर छोटा छोटा होत गेला. आता सध्या तो ङ्गारच छोटा झाला आहे आणि शरीरात एखाद्या रक्त-वाहिनीत सुद्धा बसवला जात आहे. तो शरीराच्या आत बसवलेला असला आणि लहान असला तरी त्याला कार्यरत ठेवण्यासाठी बॅटरी वापरावी लागते आणि बॅटरी दर ७२ तासांनी रिचार्ज करावी लागते. म्हणजे अजूनही पेसमेकर वापरणे हे कटकटीचेच आहे आणि त्यातून रुग्णाची सुटका करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न जारी आहेत.

जोपर्यंत बॅटरीला पर्याय सापडत नाही तोपर्यंत पेसमेकर सुटसुटीत आणि सोयीस्कर होणार नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आलेले आहे आणि या गरजेची पूर्तता करण्यासाठी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑङ्ग मिशिगन या विद्यापीठातील डॉक्टर अमीन करामी यांनी एक असे साधन विकसित केले आहे की, ते साधन चालावे यासाठी बॅटरीची गरज पडणार नाही. मग त्या साधनाला ऊर्जा मिळणार कोठून? ती ऊर्जा हृदयातूनच मिळेल.

हृदयाची धडधड व्हायला लागली की, त्या स्पंदनातूनच या साधनाला ऊर्जा मिळेल आणि हृदयाच्या या ऊर्जेतूनच ते चालू राहील. म्हणजे त्याला बॅटरी लावून बॅटरी वारंवार चार्ज करण्याची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारचे हे साधन सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरले आहे. हृदयाचे ठोके सदैव सारख्याच वेगाने पडत नसतात. त्यांचा वेग कमी-जास्त होतो. परंतु असा ङ्गरक पडला तरी या साधनाला ऊर्जा पुरविण्याच्या बाबतीत काहीही गडबड होणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment