व्यायामाने बुद्धीही तल्लख होते

प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे असे अनेक वेळा सांगितले जाते. साधारणत: शरीराला आकार देण्यासाठी, ते पिळदार होण्यासाठी किंवा ते तंदुरुस्त होण्यासाठी व्यायाम करावा असे म्हटले जात असते. व्यायाम केला म्हणजे शरीरात किती बदल झाला हेही मोजले जाते. पण व्यायामाने केवळ शरीरच नाही तर बुद्धीलाही ङ्गायदा होत असतो पण बुद्धीसाठी व्यायाम करावा असे आजवर कोणी म्हटलेले नाही. बुद्धी चांगली व्हावी म्हणून व्यायाम करावा असे कोणी सांगतही नाही. प्रत्यक्षात करण्यात आलेल्या प्रयोगात मात्र एअरोबिक मुळे मेंदूचा आकार वाढतो त्या बरोबरच लहान मुलांत आकलन शक्ती वाढत असते असे आढळून आले आहे. या बाबत अनेक संशोधकांनी प्रयोग केले आहेत. हे बदल आणि सुधारणा वयस्कर लोकांतही होऊ शकते असाही दावा काही संशोधकांनी केला आहे.

अमेरिकेतल्या इलिनॉईस विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी याबाबत काही निरीक्षणे नोंदली आहेत. बैठी कामे करण्याने शरीराची क्षमताच कमी होत आहे असे नाही तर मेंदूचीही क्षमता कमी होत आहे. अनेक प्रकारचे मनोकायिक रोग माणसाच्या आकलन शक्तीवरही विपरीत परिणाम करीत आहेत. मधुमेहाने माणसाच्या आकलन क्षमतेचाही र्‍हास होत असतो. व्यायामाने मधुमेहावर नियंत्रण आणता येते तसेच ते मेंदूच्या घटत्या क्षमतेवरही आणता येते. सतत कामात राहणे, शारीरिक हालचाली करणे, बैठी कामे करावी लागत असली तरीही त्यातल्या त्यात शरीराला हालचाली करायला लावणे या गोष्टींचाही मेंदूच्या क्षमता वाढवण्यावर थेट परिणाम होत असतो.

या संबंधात प्राण्यांवर अनेक वर्षांपासून प्रयोग करण्यात आले आहेत. माणसांवरही अलीकडे करण्यात आलेल्या प्रयोगात अमेरिकेतल्या क्रेमर्स लॅब मध्ये असे दिसून आले आहे की, आठवड्यातून किमान तीन दिवस तीन किलो मीटर्स चालण्याचा व्यायाम करणारांची बौद्धीक पातळीही चांगली असल्याचे दिसून आले आहे. ही गोष्ट वृद्धांच्या बाबतीत विशेषत्वाने दिसून आली आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळेत दाखल झालेल्या काही वृद्धांच्या मेंदूच्या ताकदीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही व्यायाम शाळांच्या संचालकांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत आपले निष्कर्ष मांडायचे ठरवले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment