बहिरेपणात वाढ होत आहे

जागतिक आरोग्य संघटनेेने केलेल्या एका पाहणीत जगातले ३६ कोटी लोक बहिरे होत असल्याचे आढळले आहे. येत्या ३ मार्च रोजी जागतिक श्रवणशक्ती दिन पाळला जातो. जगातले ३६ कोटी लोक बहिरे होत आहेत आणि बहिरेपणाचे प्रमाण ६५ वर्षे वयाच्या पुढील लोकांमध्ये अधिक प्रमाणात आहे. असे या पाहणीत आढळून आले आहे. अशा ज्येष्ठ नागरिक असलेल्या बहिर्‍यांच्या संख्या १६ कोटी ५० लाख एवढी आहे. काही लहान मुलांत बहिरेपणाचा दोष आहे आणि १५ वर्षाच्या आतील बहिर्‍या मुलांची संख्या ३ कोटी २० लाख एवढी आहे. ही संख्या चिंताजनक आहे. परंतु तिच्या इलाज आहे.

विशेषतः हा इलाज सोपा आहे. काही सोपे इलाज करून व पूर्व काळजी घेऊन यातल्या निम्म्या लोकांना तरी बहिरे होण्यापासून वाचवता येते. असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी बहिरेपणाचे निदान अगदी प्राथमिक अवस्थेत झाले पाहिजे. तसे ते झाल्यास काही लोकांना औषधांच्या साहाय्याने बहिरेपणापासून वाचवता येते. तर काही लोकांना साधेसाध्या शस्त्रक्रिया करूनसुध्दा या दोषापासून दूर ठेवता येते. काही अविकसित देशातील मुलांमध्ये गोवर, कांजण्या अशा आजारातूनही बहिरेपणा वाढतो. असे आढळले आहे.

मात्र या उपरही ज्यांना बहिरेपणापासून वाचवता येत नाही त्यांना ऐकू येणारी यंत्रे बसवून त्यांच्या या कमतरतेवर मात करता येते. मात्र जगातल्या या सगळ्या बहिर्‍या लोकांना ऐकू येण्याची यंत्रे द्यायची असतील तर त्यांचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर करावे लागेल आणि तेवढी क्षमता नाही. जगात आज जेवढ्या यंत्रांची गरज त्याच्या दहा टक्केसुध्दा यंत्रे तयार होत नाहीत. म्हणजे विविध देशांमध्ये अशा यंत्रांच्या निर्मितीला प्रचंड गती देऊन त्यांचे उत्पादन दहा पटीने वाढविण्याची गरज आहे. कर्णयंत्रांची मागासलेल्या देशाची गरज तर ङ्गार मोठी आहे. या देशातील ४० बहिर्‍यांपैकी केवळ एका बहिर्‍या व्यक्तीला कानाचे यंत्र मिळू शकते. हे प्रमाण कधी वाढणार?

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment