सप्तगुणी आवळा

आवळा या वनस्पतीला आणि ङ्गळांना आयुर्वेदात ङ्गार महत्त्व दिलेले आहे. आवळा तर गुणकारी असतोच पण वर्षातून एकदा आवळ्याच्या झाडाखाली बसून सामूहिक आवळी भोजन करावे असाही सल्ला आयुर्वेदात दिलेला असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. च्यवनप्राश या बलवर्धक औषध कम टॉनिकमध्ये आवळा मोठ्या प्रमाणावर वापरलेला असतो. कसलेही साईड इङ्गेक्ट न होता बिनधोकपणे खाता येईल आणि उत्तम आरोग्य रक्षण करील अशी ही वनस्पती आहे.

त्याचे काही ङ्गायदे असे आहेत. १) केसांसाठी तो चांगला असतो. केस लांब, घनदाट आणि चमकदार करण्यासाठी आवश्यक असलेले सारे घटक आवळ्यात आहेत. ते उत्तम हेअर टॉनिक आहे. तो केसांच्या मुळांना मजबूत करतो. एकदा मुळे मजबूत झाली की केसांची पुढची सारी प्रगती चांगली होते. त्यांना चमकही येते आणि त्यांची चांगली वाढही होते. त्यांच्यात कोंडा होत नसल्याने ते लवकर पांढरेही होत नाहीत. २) मानसिक तणावाचा परिणाम म्हणून बद्धकोष्ठ बळावतो तो आवळ्याच्या रसाच्या सेवनाने दुरुस्त होतो. त्याने दररोज पोट साङ्ग होते. या सेवनाने मूळव्याध टळते. ३) आवळ्याचे चूर्ण असते. ते जेवणापूर्वी पाण्यात, मधासोबत किंवा ताकात घालून प्राशन केल्यास चांगली भूक लागते. ४) हेच आवळा चूर्ण दररोज सकाळी मधात कालवून खावे त्यामुळे चेहर्‍यावर तकाकी येते. वृद्धत्वामुळे काही वेळा चेहरा सुरकतून जातो. ती आपत्ती असे हे चूर्ण सकाळी सकाळी घेतल्याने टळते.

५) आवळ्याचा चांगला उपयोग डोळ्यांना होतो. डोळ्यांचा दाह होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे असे त्रास आवळ्याच्या सेवनाने कमी होतात. दृष्टी सुधारते. डाळे तेजस्वी होतात. ६)आवळ्याने हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि त्यामुळे हृदय विकार टळतो. आवळ्याचा मुरंबा रोज खाणे हा हद्यविकारापासून दूर राहण्याचा एक चांगला उपाय मानला जातो. ७) शेवटचा उपयोग म्हणजे आवळ्याचा रस रोज घेतल्याने श्‍वासाचा दुर्गंध दूर होतो. दांत मजबूत होतात. म्हणून कोणत्याही आयुर्वेदिक मंजनात किंवा वज्रदंतीमध्ये आवळकाठी मिसळलेली असते. अशा रितीने आवळा हृदय, केस, डोळे, पोट, दात, त्वचा यांना उपयोगी पडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment