लग्नातील गोडवा कायम राखण्याची युक्ती

विवाह होईपर्यंतचा काळ सुखाचा असतो आणि या सुखाच्या काळाचे विवाह झाल्यानंतर सुखांतात म्हणजे सुखाचा अंत होण्यात रूपांतर होते असा जगभरातील विवाहितांचा अनुभव असला तरी लग्न नेहमीच ताजे ठेवता येते याचा धडा अमेरिकेच्या अॅरझोना प्रांतातील रॉबर्टा आणि क्रिस या जोडप्याने घालून दिला आहे.

विवाहानंतर कांही दिवसांत एकमेकांतला इंटरेस्ट संपतो आणि केवळ अॅडजस्टमेंट राहते हा दावा चुकीचा ठरविण्यासाठी रॉबर्टा आणि क्रिस गेली अठरा वर्षे दरवर्षी नव्याने विवाह करतात. म्हणजे त्यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली असली तरी दरवर्षी पुन्हा लग्न केल्याने नवविवाहित असण्याचा आनंद ते उपभेागतात. विशेष म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे स्कॉटलंड, बहामा अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन धर्मगुरू अथवा फोटोग्राफर समोर पुन्हा विवाह करतात.

लग्न झाल्यानंतर प्रथमच हनीमूनला गेले असताना रॉबर्टा हिला असे वाटले की दरवर्षी आपल्याला नवीन विवाहाचे आशीर्वाद मिळायला हवेत. त्यातून ही कल्पना सुचली. दरवर्षी रॉबर्टा नवीन वेडींग गाऊन घेते, नव्या अंगंठ्या केल्या जातात आणि छोटासाच अननसाचा गर भरलेला वेडींग केकही हे जोडपे कापते असे त्यांचे म्हणणे आहे. क्रिस नेही गेली अठरा वर्षे हा उपक्रम सुरू असला तरी आम्हाला सर्व कांही प्रथमच करत असल्याचा आनंद मिळतो अशी कबुली खर्चाची फिकिर न करता दिली आहे हे विशेष.

Leave a Comment