पाकिस्तानी क्रिकेटमध्ये साडेसात फुटी खेळाडूची एन्ट्री

फोटो साभार एसेम

पाकिस्तान क्रिकेट मध्ये लवकरच एका अतिउंच म्हणजे साडेसात फुटी गोलंदाजाची एन्ट्री होणार आहे. मुदस्सर गुज्जर नावाचा हा खेळाडू आत्ताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ७ फुट ६ इंच उंचीचा हा खेळाडू मुळचा लाहोरचा असून पाकिस्तानी सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स टीम कडून खेळणार आहे.

पाकिस्तानी क्रिकेट टीम नेहमीच वेगवान गोलंदाजीसाठी चर्चेत राहिली आहे. त्यात आता गुज्जरची भर पडली आहे. गुज्जरला पाकिस्तानी संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची इच्छा आहे. अर्थात सध्या त्याची चर्चा त्यांच्या गोलंदाजी कौशल्याबद्दल नाही तर असाधारण उंचीमुळे होते आहे. गुज्जर शाळेत असतानाच त्याची उंची ६ फुट झाली होती. त्याच्या बुटाचे माप २३.५ असून अति उंचीमुळे तो कार चालवू शकत नाही. डेली मेल ने दिलेल्या बातमीनुसार सात महिन्यापूर्वी त्याने क्रिकेट प्रशिक्षण सुरु केले पण करोना मुळे ते मधेच बंद झाले होते.

गुज्जरच्या अतिउंचीचा फायदा म्हणजे तो वेगाने धावू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे गुज्जरची ही उंची हार्मोन मधील असंतुलनाचा परिणाम आहे.