औषध घ्या आणि दीडशे वर्षे जगा

माणसाचे कमाल आयुष्य किती? ङ्गार वर्षांपूर्वीपासून ते १०० वर्षे असल्याचे मानले जाते. निरोगी आयुष्य जगणारे लोक १०० वर्षे जगू शकतात. त्यापेक्षाही अधिक काळ जगणारे लोक आहेत. परंतु तरी सुद्धा १०० या आकड्यावर माणसाने खूण केलेली आहे. परंतु आता काही शास्त्रज्ञांनी असे औषध तयार केले आहे की, ज्यामुळे माणसाचे कमाल आर्युमान सरासरी दीडशे वर्षे होऊ शकेल. ही काही कपोलकल्पित हकीकत नाही किंवा आख्यायिकाही नाही. काही वेळा विज्ञान साहित्यामध्ये अशा कल्पना करून कथा रचल्या जातात. परंतु दीडशे वर्षाची ही कथासुद्धा नाही.

ही तर वस्तुस्थिती आहे आणि येत्या पाच वर्षांमध्ये असे एक औषध बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे की, ज्यामुळे माणसाचे सरासरी कमाल आर्युमान दीडशे वर्षे होऊ शकेल. त्यासाठी करण्यात आलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत. माणसाला मृत्यू कशाने येतो, यावर तर संशोधन झालेले आहेच. त्यातून असे दिसून आले आहे की, मधुमेह, रक्तदाब, तणाव, हृदयविकार असे काही विशिष्ट आजार आहेत की, ज्यामुळे माणूस वृद्ध होतो. तेव्हा अशा एकूण २० विकारांवर एकाचवेळी लागू पडेल असे एकच रामबाण औषध तयार करता येईल काय, यावर बरेच संशोधन झालेले आहे. त्यासाठी ११७ निरनिराळ्या औषधांची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्या प्रयोगातून असे एकच औषध विकसित करण्यात आले आहे की, ज्यामुळे हे २० आजार आटोक्यात राहतील.

म्हणजे २० विकारांवर गुणकारी ठरणारे एकच औषध सापडले आहे. ते घेतले की, हे विकारही होत नाहीत आणि वृद्धत्वाकडची वाटचाल सुद्धा मंदावते. तेव्हा ही विशिष्ट एन्झाईमची गोळी नियमाने घेत गेलो की, वृद्धत्वामुळे होणारा मृत्यू लांबणीवर पडेल. या एन्झाईमच्या गुणांचा मागोवा घेतला असता असे ध्यानात आले आहे की, त्यामुळे सरासरी आयुष्यमान दीडशे वर्षे एवढे होऊ शकते. म्हणजे येत्या दहा-पाच वर्षांमध्ये मानवतेची वाटचाल दीडशे वर्षे जगण्याकडे होणार आहे. त्यामुळे निर्माण होणारे किती तरी सामाजिक आणि आर्थिक प्रश्‍न काय असतील याचाही आढावा घेतला जात आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑङ्ग साऊथ वेल्थ मेडिसीन या विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड सिन्क्लेअर यांनी या संशोधनात लक्ष घातले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment