लवकरच व्हॉट्सअॅप वेबवरून करु शकणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग


नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपच्या वेब युजर्संना लवकरच व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर मिळू शकणार आहे. एका नवीन रिपोर्टनुसार, आपल्या वेब व्हर्जनवर व्हॉट्सअॅप व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग आणण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. या फीचरला वेब व्हर्जन 2.2043.7 मध्ये आलेल्या एका नवीन अपडेटनंतर पाहिले गेले होते. पब्लिक रिलीज आधी कंपनी याची टेस्टिंग करीत आहे. आधीपासूनच अँड्रॉयड व आयओएस अॅपमध्ये व्हॉट्सअॅप व्हाइस आणि व्हिडिओ कॉल उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅप फीचरला ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट अपडेट सोबत डेस्कटॉप व्हर्जनवर 2.2043.7 व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी सपोर्ट इंटिग्रेटेड आहे. हे फीचर आता बीटा फेजमध्ये आहे. यासंदर्भातील काही स्क्रीनशॉट WABetaInfo ने शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटवरून माहिती होत आहे की, डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरचा कॉल येतो. एक पॉप विंडो उघडते. या विंडो वर कॉल रिसिव्ह करणे आणि रिजेक्ट करण्याचे ऑप्शन राहते. खाली बाजुला इग्नोर ऑप्शन आहे. तर कॉल करण्यासाठी एक छोटी पॉप अप विंडोमध्ये video, mute, decline यासारखे ऑप्शन राहते.

अपडेट सोबत ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी अपडेट आले आहे. हे फीचर टेस्टसाठी उपलब्ध नाही झाले आणि लवकरच ते वेब व्हर्जनमध्ये अॅड केले जाणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कंपनीने अद्याप या नवीन फीचर संदर्भातील कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.