चंद्रकांत पाटील यांना विश्वास; नाथाभाऊ पक्ष सोडणार नाही


पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या पक्षप्रवेश काहीजणांकडून तर निश्चित केला गेला असून त्याचा मुहूर्त देखील जाहीर करण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे खडसे यांनी गेल्या काही अनेक दिवसांपासून शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेते मंडळींच्या भेटीगाठी आहेत. पण याही परिस्थितीत एकनाथ खडसे हे पक्ष सोडून जाणार नाही, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना चंद्रकांत पाटील नाथाभाऊंच्या प्रती विश्वास व्यक्त करताना म्हणाले, एकनाथ खडसे भाजपचे नुकसान नुकसान होईल असे, कधीही वागणार वागणार नाहीत. ते पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील आणि ते कुठेही जाणार नाहीत. पण यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे जे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. तसेच खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावत प्रवास करून केलेला पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा उपयोगाचा नाही. कोरडा प्रवास त्यांनी करू नये. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि निर्णय घेऊ शकतात. तातडीने त्यानी मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यासाठी पंचनामे करण्याची गरज नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर टीका केली.